चाराक्षरी काव्य रचना {७८}
विश्वामध्ये
महत्वाचे
छोटी वस्तू
योग्य साजे
सान मोठ्या
गोष्टींवर
अर्थ प्राप्त
होई तर
जीवनाचा
विलक्षण
पैलू भासे
सुलक्षण
सुई असो
वा विमान
उपयुक्त
वाटे छान
अंत:काळी
सुई येते
शिवणाचे
कार्य देते
सेप्टी पीन
साडीवर
जागोजागी
लागे तर
उपयुक्त
वापरात
कृतज्ञता
ती करात
पिना चाकू
कात्र्या पाना
मशिनरी
कामी आणा
पांडवांना
तेरा वर्ष
अज्ञवासा
हो संघर्ष
शस्त्र क्षमी
वृक्षावर
पार्थ लुप्त
केल्यावर
कुरुक्षेत्री
कामा आली
विजयाचे
कार्ये झाली
कर्नाटका
राक्षसास
चामुंडेने
केला ऱ्हास
महत्वाचे
काय आहे
मानवच
शोधू पाहे
मालकीच्या
आदरात
कौशल्यास
रुजे त्यात
उपयोगी
साधनांना
मान्य करु
वाटे त्यांना
देवी देई
साम्य स्त्रोत
जन मना
ओतप्रोत
चंडी होम
उच्चारण
माता करी
हो क्षमण
बुद्धी मध्ये
दिव्यत्वास
देवी पूजा
होई खास
दिव्यत्वाची
जाण व्हावी
अध्यात्मात
रुची यावी

– रचना : सौ शोभा प्रकाश कोठावदे, नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800