Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यचारोळ्या

चारोळ्या

तुझे माझ्याशिवाय,
काहीच चालत नाही..
पण तुझ्यासाठी जगताना,
मी माझी उरतच नाही..।

तुझी वेदना मला,
तुझ्या डोळ्यातून दिसली..
ती पाहून माझी भरती,
ओहटीतच विरून गेली..।

कशी कळेल तुला,
विरहातील वेदना..
तुझ्याशिवाय दिवस,
आणि रात्रही संपेना..।

दुःखालाच वाटलं जेव्हा,
मला सुखं मिळावं..
मलाही वाटलं तेव्हा,
माझं आयुष्य दुपटीने वाढावं..।

तुझ्या डोळ्यांना पाहून,
नकळत भाळले..
पण दिसतं तसं नसतं,
जगाने समजावले..।

पोरी, तुला पाहताना,
तीट लावायची राहिली..
काही हरकत नाही,
तेव्हा अमावसच होती..।

चांदण्यांमधे चंद्र म्हणजे,
मुलीत मुलगा लांबोडा..
रूप रोजचे फसवे किती,
असा कसा रे सोंगाड्या..।

पकडू पकडू म्हणता म्हणता,
क्षण हातातून गेले निसटून..
नव्हते मला कळले तेव्हा,
त्याचाही टॅटू असतो म्हणून !

काय तुझा रुबाब,
अन काय तुझा तोरा..
मी नाही भुलणार आता,
व्यर्थ तुझा सारा नखरा..।

पोरा, ये ना लवकर,
किती रे पाहू वाट..
ढगातली विमाने नुसती पाहताना,
कणा आता नाही रहात ताठ..।

वारा नाही, पाऊस नाही,
वादळ नाही, बरसात नाही..
जाऊ दे झालं, आता,
आपल्यात काही घडायचंच नाही..।

तुला वाढविताना मी,
निरांजनांनी ओवाळले..
असे होते का मी संस्कार केले,
की तू मुलांसाठी मेण वितळवले..।

किती रे अजून पाहू वाट,
व्यर्थ आहे माझा शृंगार..
आता दिसत्येय फक्त चढण,
आणि आत उतार उतार..।

तुला पाहताच माझं,
आभाळ ठेंगणं झालं..
काय माहित मला,
पृथ्वीचं तेव्हा काय बिनसलं..।

तुझ्यापेक्षा ‘ ती ‘ बरी,
असे कधी वाटलेच नाही..
वाटावेही का असे,
कोणी ‘ ती ‘ भेटलीच नाही ..।

कापूर पेटविताना त्याला,
लागतो मायेचा स्पर्श..
काय माहित, तुला,
हवा सुगंध, का हवे मेण रुक्ष..।

शिडी होती उंच,
पण दुसऱ्या पायरीलाच थांबले..
कसे सांगू, तुला,.
का माझे स्वप्न भंगले..।

सगळीच दुःख काही,
छापायची नसतात,
‘writers cramp’ आलाय सांगून,
काही लपवायचीही असतात..।

आनंदापेक्षा दुःखच कविता मागतात..
हास्यापेक्षा अश्रुच
शब्दांना जवळचे वाटतात..।

धूप राहतो जळत,
त्याचा सुगंध पसरतो..
मेणबत्ती रहाते जळत,
तिचा अश्रू सांडतो..।

वेदनेला वाटते काव्य जवळचे,
काव्याला जवळ वेदना..
अशा मुशीतूनच सोने उजळते,
पटते का तुला, सांग ना. ।

तुला काय माहित,
मला काय वाटलं..
वाटणारही का नाही..
त्याने तुला दूर लोटलं..।

शब्दांची वाट पाहात,
हातावर हात ठेऊन बसले..
हे खरे नाही। ‘ कवित्व ‘
‘ हे ‘ हसून म्हणाले..।

अनुराधा जोगदेव

– कवयित्री : सौ.अनुराधा हेमंत जोगदेव. पुणे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खुप छान व भावनिक कविता 👌👌👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा