सावित्रीबाईं फुले जयंती निमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर पिंपरी चिंचवड शाखेतर्फे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रा.सुरेखा कटारिया, डाॅ.श्वेता राठोड, अंजली देशमुख, डाॅ.ज्योती शेट्टी,दिपाली पेंडसे कुलकर्णी (अमेरिका) यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री पेंडसेकाका म्हणाले, अंनिसने हुतात्मा डाॅ.नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ स्थापन केले असून त्या अंतर्गत ह्या वर्षापासुन व्याखानमाला सुरु करण्यात येणार आहे. अधूनमधून अश्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यामुळे अंनिस चळवळीला बळकटी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा.सुरेखा कटारिया आणि डाॅ.श्वेता राठोड यांनी द्वि पात्री नाट्यछटा संवादातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृवाची चांगली मांडणी केली. तसेच सुरेल पोवाडा गाऊन कार्यक्रमांत रंगत आणली.

त्यानंतर दिपाली पेंडसे कुलकर्णी, यांनी त्या अमेरिकेंत चालवत असलेल्या “गुरुकुल- माझी फुलपाखरे” या उपक्रमातून तेथील मराठी कुटुंबातील मुलांसाठी मराठीचे वर्ग कसे घेतले जातात ह्याची हसत खेळत माहिती दिली. अमेरिकेत मुलांना मराठी शिकण्याची गरज त्यानी अधोरेखित केली. अंजली देशमुख अशा स्वरूपाची बालवाडी देहूरोडला गेली कित्येक वर्ष चालवून संसाराला हातभार लावत आहेत हे सर्वांना कौतुकास्पद वाटले.
डाॅ.ज्योती शेट्टी यानी अध्यक्षीय भाषणांत, स्त्रियांचे शिक्षण किती आवश्यक आहे हे सांगितले.
अलका जाधव यांनी सर्वच आधुनिक सावित्रीचा छान परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इला पवार यांनी आकर्षक शैलीत केले. मिलिंद देशमुख यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यांत, बावनकर, सरोज पेंडसे, प्रदीप तासगांवकर, मनिषा चक्रे, इंद्रजित व सर्वच कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
