Homeसाहित्यचिंधी बोट ..

चिंधी बोट ..

(विडंबन काव्य)

कशी दाखवू जखम
बोटाला बांधी चिंधी
सत्य लपते खोलवर
कुवृत्ती ती छंदीफंदी

अनामिका लईभारी
क्षणार्धात होई चांदी
दृष्टी पाडे बाहुलीची
तिचीनजर भारीगंधी

ओम् फट्ट स्वाहा करे
निखळून पडेलफांदी
विनाशस्त्र सूड उगवे
दुःखात लोटे आनंदी

इनकमिंग तिजोरीत
दिसे नोटे वरचं गांधी
शांतसुंदर आयुष्यात
आणते वादळीआंधी

बाबाआश्रमात तेजी
जगभर असूद्या मंदी
देव बसले देव घरात
बाबांनाचं जगत् वंदी

परग्रहावर विश्व जाई
इथे जादू टोणा नांदी
आश्रमात स्वर्ग सोयी
रे अंध भक्तांची मांदी

राज कारणी सामीलं
करे बाबांची खाविंदी
कायदा भिऊनि पळे
चालत राहील बेबंधी

उच्च शिक्षित शहाणे
विचारा करतात बंदी
अंतन काळ्याजादूस
मातवणारं अनागोंदी

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments