तुझ्या लेखणीचा जीव
असा गुंतला शब्दात
नवे रेखले तू चित्र
जीव ओतला गात्रात.
असे रंगवले नेत्र
जीव ओतला डोळ्यात
तुझ्या माझ्या जीवाची
एक झाली प्राणज्योत.
मग रंगले काळीज
आत भावना कल्लोळ
तुझ्या आठवांचा ओघ
आता निर्वाणी ची वेळ
रंग भिनले श्वासात
विरे आत्म्याचे हे भान
तुझा माझा एक प्राण
जीव शीव एक आण.
तूच झाला सदाशिव
मीही नाद ब्रम्ह उमा
चित्र झाले नादमय
जीव आत्मा एक जमा.

– रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
उतारवयातील प्रेमाची सुंदर कविता.