भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवा निमित्ताने
हिंदी चित्रपटातील ७५ वर्षात गाजलेली लोकप्रिय गाणी आणि त्याचे रसग्रहण करीत आहे चित्रपट रसिक, निवृत्त माहिती संचालक श्री सुधाकर तोरणे….
भाग १
भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवाच्या वर्षात हिंदी चित्रपटातील लोकप्रिय ठरलेली व गाजलेली त्या त्या वर्षातील गाणी सादर करतांना मला आनंद होत आहे.
७५ वर्षातील या गाजलेल्या आणि सर्वांच्या मुखात गुणगुणणाऱ्या या गाण्यांनी जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आपला ठसा उमटविला आहे. ७५ वर्षातील प्रत्येक वर्षातील गाणी एकदम सर्व न देता पाच भागात १५-१६ च्या संख्येने आणि मुख्य म्हणजे त्या सालातील पिढींच्या हिशेबाने देण्याचा प्रयत्न केला आहे.
आज १९४८ ते १९५७ पर्यंत देत आहे. एका वर्षात २-३ गाजलेली गाणी जनताप्रिय ठरली त्यांचाहि समावेश करण्यात आला आहे
१९४८…
‘शहिद’ चित्रपटातील” वतन की राह मे”हे गुलाम हैदर यांनी संगीत बध्द केलेले देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शहिदांसाठी असून ते फारच लोकप्रिय ठरले.
१९४९…
‘महल’ चित्रपटातील “आये गा आनेवाला” हे लता मंगेशकर यांनी गायिलेले असून या गीताने हिंदी चित्रपटसृष्टीत लताजींचे प्रभूत्व श्रेष्ठ ठरले. त्याचवर्षी ‘दुलारी’ मधील “सुहानी रात ढल चुकी”या गीताने महंमद रफींची लोकप्रियता वाढली.
१९५१…
‘बाजी’ चित्रपटातील साहिर लुधियानींचे गीत” तदबीर से बिगडी हुइ तकदीर” हे एस.डी. बर्मन यांनी संगीतबध्द केलेले व चित्रपटात गीताबालीने गायलेले दाखविलेले गजल स्वरूपातले गीत खुपच गाजले.
१९५३…
‘दो बिघा झमीन’ चित्रपटातले “मौसम बीता जाय”या मन्ना डे यांनी गायलेल्या आणि देशातील असमानतेवर भाष्य केलेल्या गीताने उत्तम लोकप्रियता मिळवली.
१९५४…
‘जाग्रुती’ या चित्रपटातील “दे दि हमे आझादी” या कवी प्रदीप यांच्या देशभक्तीपर गाण्याने आणि महात्मा गांधी यांच्या कार्यावर आधारित गीताने अमाप लोकप्रियता मिळवली. गांधी जयंतीच्या दिवशी रेडिओ शाळांमधून आजही नेहमी लावण्यात येते…
१९५५…
राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ चित्रपटातील “प्यार हुआ इकरार हुआ” हे लताजी व मन्नाडे यांनी गायिलेले गीत तर आजही लोकप्रिय आहे.राजकपूर व नरगीस यांच्या छत्रीतील या गाण्याने बहार उडवून दिली होती.
१९५६….
‘प्यासा’ या गुरुदत्त यांच्या चित्रपटातील “यह दुनिया अगर मिल भी जाये तो” या महमंद रफी यांनी अगदी जीव तोडून गायिलेल्या गीताने खळबळच उडवून दिली या काळात जगातील, समाजातील जगण्याने तर शेवटच्या “जला दो इसे,फूंक डालो ये दुनिया”हे आर्जवाने म्हटलेल्या गीतात गुरुदत्त यांचा राग प्रकर्षाने दिसला.याच चित्रपटातील “जिन्हे है हिंद पर नाझ है वो.कहाँ है” हे साहिर लुधियानींचे गीतामुळे ते चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरले.
१९५७….
‘नयादौर’ चित्रपटातील “मांग के साथ तुम्हारा” हे. ओ.पी नय्यर यांचे दिलीपकुमार व वैजयंतीमाला यांच्या अभिनयातील टांग्यातील गाण्याने, आणि घोड्यांच्या टपटप संगीताने तरूणाईत धमाल उडवून दिली होती.क्रमशः

– लेखन : सुधाकर तोरणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
खूप सुंदर लेख। संगीताचे जीवनातील
अनन्यसाधारण महत्व स्वाती गोखले यांनी खूप
चांगल्या प्रकारे मांडले आहे
संगीत प्रेमीला आपण तानसेनाची उपमा
देतो आणि संगीत द्वेष्ट्याला औरंगजेबाची उपमा
देतो। ते उगाच नाही
आपले संपादन देखील उत्तम झाले आहे