भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमिताने आपण ७५ वर्षात हिंदी चित्रपटातील गाजलेली लोकप्रिय गाणी या पूर्वीच्या भागात पाहिली.
१९७८ पासून पुढील गाणी आजच्या तिसऱ्या भागात पाहू या…..
१९७८..
‘शालीमार‘ चित्रपट फ्लाँप झाला परंतु त्यातील “हम बेवफा” गाणं लोकप्रिय झालं.
१९८०
महेश भट यांच्या ‘अर्थ‘ चित्रपटातील जगजतसिंह आणि चित्रा यांनी स्वरबध्द केलेली गझल “तुम इतना जो” फारच लोकप्रिय ठरली.
याच वर्षी फिरोज खान यांच्या ‘कुर्बानी‘ या चित्रपटातील संगीतकार बिट्टू यांनी संगीतबध्द केलेले “आप जैसा कोयी” हे डिस्को गाणं तुफान गाजलं. पाकिस्तानी गायिका नाझिया हसनने हे गीत गायलं.
१९८१…
संगीतकार शिव-हरी यांनी संगीतबद्ध केलेले ‘सिलसिला‘ चित्रपटातील जावेद अख्तर यांचे गीत
“यह कहाँ आ गये हम” चांगलेच गाजले.
याच वर्षी ‘उमराव जान‘ या रेखाने अभिनय केलेल्या चित्रपटातले “दिल चिझ क्या है” हे गीत फारच गाजले. त्या काळातील रसिक लोकांच्या ह्रुदयाचा ठावच या गीताने घेतला.
१९८२ ते १९८६ काळातील गाणी फारशी लोकप्रिय झाली नाहीत.
१९८७
आर.डी.बर्मन यांनी संगीतबध्द केलेले ‘इजाजत‘ चित्रपटातील “मेरा कुछ सामान” हे गाणं तरूणाईत फारच लोकप्रिय ठरले.
१९८८
एका रात्रीत सुपर स्टार झालेल्या अमीरखान अभिनित
‘कयामत से कयामत‘ या चित्रपटातील “पपा कहेते है” ह्या उदित नारायण यांनी गायलेल्या गाण्यानं तुफान लोकप्रियता मिळवली आणि उदित नारायण एक उत्तम पार्श्वगायक म्हणून नावारूपाला आले.
१९८९
‘मैने प्यार किया‘ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं “कबुतर जा जा” गाणं तरुणाईत फारच लोकप्रिय ठरलं. संगीतकार राम लक्ष्मण यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटातील जवळपास सर्वच गाणी लोकप्रिय ठरली.
१९९०
संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी लताजींच्या आवाजात संगीतबध्द केलेले ‘लेकिन‘ या चित्रपटातील “यारा सिल्ली सिल्ली” गाणं फारच गाजलं
याच वर्षी ‘आशिकी‘ चित्रपटात कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं द्वंदगीत “धीरे धीरे से” चांगलेच लोकप्रिय ठरले.
१९९२
मनीरत्नम यांच्या गाजलेल्या तामीळ चित्रपटातून हिंदीत रूपांतर केलेल्या ‘रोजा‘ या चित्रपटात मिन्मिनीने गायलेलं आणि बॉलिवुडमध्ये नव्याने आलेल्या ए.आर.रेहमान यांनी संगीतबध्द केलेल्या “छोटी शी आशा” या गीताने तर तुफान यश मिळविले.
१९९३..
दलित महिलेच्या जीवनावरील ‘रूदाली‘ या भुपेंद्र हजारिका यांनी संगीतबध्द केलेल्या चित्रपटात
लताजींनी गायलेल्या “दिल हुम हूम करे” या गीताने प्रचंड लोकप्रियता संपादन केली.
१९९४
‘मैने प्यार किया’ चित्रपटाच्या यशानंतर सुरज बरजात्या यांच्या ‘हम आपके है कौन‘ या चित्रपटात राम लक्ष्मण यांनीच संगीतबध्द केलेले “माये ने माये” गाणं तुफान लोकप्रिय ठरलं. या चित्रपटातील सर्वच गाणी खुपच गाजली.
१९९५
‘दिलवाले दुलहनीया ले जायेंगे‘ या लोकप्रिय झालेल्या चित्रपटातील “तुझे देखा तो” हे गाणं चांगलच
गाजलं.
याच वर्षी मुंबईत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभमीवरील ‘बाँबे‘ चित्रपटात हरिहरण व कविता क्रुष्णमूर्ती यांनी गायलेलं “तू ही रे” गाणं बरच लोकप्रिय ठरलं.
१९९६
विशाल भारद्वाज यांच्या ‘माचीस‘ या चित्रपटातील हरिहरण आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं “छोड आये है हम वो गलिया” तुफान लोकप्रिय ठरलं.

– लेखन : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
१९७८ ते १९९६ ह्या तब्बल अठरा वर्षांमधील हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतांचे सुंदर समालोचन श्री सुधाकर तोरणे सरांच्या लेखणीतून साकार झाले आहे. अत्यंत समर्पक शब्दांत दर वर्षी नावाजलेले चित्रपट व त्यामधील चित्रपट गीत व्यवस्थितपणे मांडले आहे.