Wednesday, September 17, 2025
Homeकलाचित्रगीत

चित्रगीत

तेरी मिट्टी……
काही गीत च अशी असतात ना, की त्यांच्यातील गहन अर्थाने ती जिवंत होतात. साक्षात शब्द खरं रूप धारण करून आपल्याला भावनिक आणि मंत्रमुग्ध करून टाकतात.

तेरी मिट्टी हे असच एक गीत…

तेरी मिट्टी हे गीत मी खूप वेळा ऐकलं आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटले.
हे माझं एकमेव आवडत गीत !!!
केसरी चित्रपटातील हे गीत ऐकतांना रोमरोमात चैतन्य जागृत होते.

एक असा सैनिक जो मृत्यूच्या दारात उभा आहे आपली जीवनाची शेवटची घटका मोजत असतांना रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे परंतु त्याला जेव्हा एक प्रश्न पडतो की ही दुष्मनाची गोळी मी छातीवर का झेलली त्याचे उत्तर म्हणजेत हे संपूर्ण गीत आहे.

मातृभूमी बद्दल कवीने व्यक्त केलेलं प्रेम याला खरंच तोड नाही. शब्दरूपी भावनेतून कवीने एका सैनिकांची आपल्या देशाबद्दल ची ओढ या गीतात सांगितली.
कवी ने मातृभूमीबद्दल असलेले नितांत प्रेमाची परिसीमा काय असते ती एका सैनिकांच्या नजरेतून यात व्यक्त केली.

मनोज मुंतशीर यांनी लिहलेली
ही शब्द सुमने अगदी भावुक करून जातात.
एका एका वाक्यात, शब्दात व्यक्त केलेलं मातृप्रेम आणि देशप्रेमाच्या भावना दडल्यात हे स्पष्ट दिसून येत..

मी कित्येक वेळा हे ऐकलं, बघितलं तरीही मन भरत नाही. प्रत्येक वेळेस मातृभूमीबद्दल च्या प्रेमाच वेगळ फुल उमललेलं दिसत.

एक देशाचा, मातृभूमीचा रक्षक म्हणून जेव्हा तो आपल्या मातृभूमीबद्दलच्या इच्छा आणि प्रेम व्यक्त करतो ते शब्द ऐकतांना अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही. डोळे न कळत भरून येतात.

एका सैनिकांच्या किती छोट्या पण विचार करायला लावणाऱ्या अपेक्षा असतात हे दिसून येते…
हजारो गाणी तराजूच्या एका पारड्यात टाकली तरी याची बरोबरी कोणी करू शकणार नाही. याच्या गहन भावनांची बरोबरी कोणी करू शकत नाही..
कवी सुरवात अगदी सुंदर करतो….

तलवारों पे सर वार दिए
अंगारों में जिस्म जलाया है
तब जाके के कहीं हमने सर पे
यह केसरी रंग सजाया है

आम्ही तलवारीवर आमची शीर दिलीत पण कधी घाबरलो नाही, भ्यालो नाही. धगधगत्या ज्वालामधे आमची शरीर जळाली तेव्हा कोठे आमच्या डोक्यावर आम्ही हा शौर्याचे प्रतीक असलेला भगवा रंग आणि ती पगडी चढवली आहे, सजवली आहे. ती काही अशीच घातलेली नाही तिच्या मागे कित्येक शूर विरांचे हुतात्म्य बलिदान आहे.

ऐ मेरी ज़मीन अफ़सोस नहीं
जो तेरे लिए सौ दर्द सहे
महफ़ूज़ रहे तेरी आन सदा
चाहे जान मेरी ये रहे ना रहे.

येथे तो आपल्या मायभूमीला उद्देशून म्हणतोय की तुझ्यासाठी शंभर वेळा कोणताही त्रास, वेदना सहन मरण पत्करायला मला काहीच वाटणार नाही, मला काहीच पश्चाताप ही होणार नाही, फक्त तुला दिलेले वचन अबाधित राहील पाहिजे मग माझा जिव राहिला, नाही राहिला तरी काही फरक पडणार नाही.
किती आपल्या भूमी बद्दल हे प्रेम !!!— ऐ मेरी ज़मीन महबूब मेरी
मेरी नस नस में तेरा इश्क़ बहे
फीका ना पड़े कभी रंग तेरा
जिस्मों से निकल के ख़ून कहे

सैनिक म्हणतो, “हे मायभूमी, तू खरी माझी सखी आहे, प्राण प्रिय आहे. आणि माझ्या नसा नसात तुझेच प्रेम सतत वाहत असते. त्या प्रेमाचा रंग मात्र कधी कमी होऊ नये ते प्रेम कमी होऊ नये हेच माझ्यातील रक्त जणू सांगतय..”
या सैनिका ला फक्त मायभूमीच आकर्षण आहे आणि तिच्यासाठी तो काहिही करायला तयार आहे कारण तिच्यावर तो जीवापाड प्रेम करतो.
— तेरी मिट्टी में मिल जावाँ
गुल बनके मैं खिल जावाँ
इतनी सी है दिल की आरज़ू
तेरी नदियों में बह जावाँ
तेरे खेतों में लहरावाँ
इतनी सी है दिल की आरज़ू

तो सैनिक म्हणतो हे मायभूमी, माझ्या खूप छोट्याश्या इच्छा आहेत
काय आहेत त्या ??
आमचा अपेक्षांचा डोंगर वाढतच जातो. आमच्या देशाकडून, सरकारकडून खूप अपेक्षा !! त्याची गिनती नाही.
इथं मात्र थोड वेगळ आहे, तो म्हणतो, तुझ्या मातीत मिळून जावं. तुझ्यात एकरूप व्हावं. फुल बनून मी या जमिनीत उमलाव एवढीच माझी छोटीशी इच्छा आहे. तुझ्या नद्यामध्ये पाणी बनून वाहत जावं तूझ्या शेतामध्ये पीक बनून डोलाव हीच इच्छा आहे !! (हे लिहतांना सुद्धा डोळ्यात पाणी येतेय, अंगावर शहारे येतायेत किती तो त्याग !!)
किती ते प्रेम… खरंच आपण विचार सुद्धा करू शकत नाही पण ही सत्य परिस्थिती आहे. कोणत्याही सैनिकांच्या आपल्या मायभूमि कडून इतक्या छोट्या अपेक्षा असतात, इच्छा असतात आणि म्हणून तो सैनिक असतो…— वो ओ…
सरसों से भरे खलिहान मेरे
जहाँ झूम के भंगड़ा पा ना सका आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा ना सका

तो सैनिक म्हणतो, “मी तर आता सरहदी वर आलोय, परंतु धान्यांनी भरलेल्या गावाकडील शेतामध्ये मी भांगडा (नाच /गाणे) करू शकलो नाही, परंतु माझे ते गाव आणि जमीन खूषहाल राहो जिथे मी परत जाऊ शकलो नाही.
त्या सैनिकाला वाईटही वाटते की आपण आपल्या गावाकडे जाऊ शकलो नाही, तरीही तो आपल्या गावाला मरणाच्या दारात सुद्धा न विसरता शुभकामना दयायला विसरत नाही… हा खरा सैनिक ही खरी राष्ट्रसेवा !!!

— हो वतना वे, मेरे वतना वे
तेरा मेरा प्यार निराला था
कुर्बान हुआ तेरी अस्मत पे
मैं कितना नसीबों वाला था

सैनिक पुढे म्हणतो, “हे मायभूमी, तुझं आणि माझं प्रेम वेगळच आहे. ते कोणाला कळणार नाही, तुझ्या सन्मानार्थ बलिदान दयायला मिळत म्हणजे मी नशीबवान होतो हे मला कळतंय
माझ्या सारखा नशीबवान कोणीच नाही अस त्या सैनिकाला म्हणायचं आहे..”

— ओ हीर मेरी तू हँसती रहे
तेरी आँख घड़ी भर नम ना हो
मैं मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो

या ठिकाणी सैनिक आपल्या प्रियेला सांगतो आहे.
तो म्हणतो, “हे माझे प्रिये, तू खरी तर माझी प्राण प्रिय आहेस आणि तू नेहमी हसत मुख असावी. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी ख़ुशी असावी. तुझ्या डोळ्यामध्ये क्षणभर सुद्धा दुःखाने एक थेंब अश्रू येऊ नये.
विरमरण प्राप्त होतांना त्याला आलेली आपल्या प्रियेची आठवण किती काळजाचे तुकडे करणारी आहे ही कल्पना आपण करू शकतो सैनिकांला बघा किती काळजी आपल्या प्रिय व्यक्तीची !!!”

— ओ माई मेरी क्या फ़िक़र तुझे
क्यूँ आँख से दरिया बहता है
तू कहती थी तेरा चाँद हूँ मैं और चाँद हमेशा रहता है

शेवटचे कडवे कवीने सैनिकांच्या माई साठी  (बहिणीसाठी) लिहलंय.
युद्धा मध्ये पूर्वी बहिणींना भाऊ युद्धातून परत आला तर त्यांच्या कडून सन्मान मिळत नव्हता..
त्याला जशी आपल्या मायभूमीची, आपल्या सखी ची काळजी आहे तशीच आपल्या माईची ची पण काळजी आहे.
तो म्हणतो, “की माई, तू कसली चिंता करतेस ? माझी तर मुळीच करू नको. मला काही होणार नाही.
तुझ्या डोळ्यातून का अश्रूच्या धारा वाहत आहे ? अग तू तर मला म्हणत होती की तू माझा चांद आहेस ?
अग मग हा चांद तर नेहमी असतो ना, तसा मी नेहमी तुझ्यासाठी असणार आहे…
सैनिक यातून आपल्या माईची गोड समजूत घालण्याचा जणू प्रयत्न करतांना दिसतो…

खरंच किती सुंदर अर्थ आणि भाव या गीतातून मांडला आहे.
हे गीत केव्हाही ऐका पुन्हा ऐकावेसे वाटते…
जय हिंद….

प्रकाश फासाटे

– लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं