दर्यावरी आमची डोलं होडी …
जगातील सर्व प्रमुख संस्कृती, गावं आणि शहरे ही समुद्र, नदी, सरोवर, तलाव यांच्या किनारी वसलेली आहेत. माल वाहतूक, प्रवास, मासेमारी, पर्यटन, क्रीडा आणि मनोरंजन यासाठी जलस्त्रोत महत्वाचे असतात. या सर्वांचा प्रभाव साहित्य, चित्रकला, नृत्य, नाटक आणि अर्थातच चित्रपट या सर्व माध्यमांवर पडलेला दिसून येतो.
प्रवाह शांत असो खवळलेला, वादळ असो की पडलेला वारा, नावाडी अंगावर घेतो. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला’, गात पुढे जातो. अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि सामुहिक शक्तीतून पुढे जाताना लयबद्ध सूर त्याच्या मुखातून बाहेर पडतात. त्यांचे साधे सोपे शब्द लाटांच्या लयीची, वाऱ्याच्या सुरांची आणि निळ्या जलाशयाची साथ करीत ओठावर येतात. ’तुझे चलना होगा’ म्हणत जगण्याचे बळ देतात.
लोक संगीतात कोळी गीत किंवा नावाडी लोकांनी गायलेले महत्वाचे ठरते. डॉ. भूपेन हजारिका आणि सचिन देव बर्मन यासारख्या संगीतकारांनी या लोकगीतांचा चित्रपटात सुरेख उपयोग केला. हजारिका यांचे ब्रम्हपुत्रा नदीवरचे ‘गंगा क्यो बहती हो’ असो की बर्मन यांचे ‘सुजाता’ सिनेमातील ‘ओ माझी रे’ ची ललकारी, त्याची उदाहरणे आहेत. बर्मन हे त्रिपुरा राजघराण्याशी संबंध असलेले. त्यांना लोकसंगीताची प्रचंड आवड. आगरतळा येथील नीर महालात जेव्हा जात, तेव्हा नावाडी जे गीत गात ते ध्यानपूर्वक ऐकत. त्याचाच उपयोग त्यांनी आपल्या गीतात केल्याचे सांगितले जाते.
मराठीत अनेक सुरेख कोळी गीतं आहेत. हेमंत कुमार/लताजी यांनी गायलेल्या ‘मी डोलकर डोलकर दर्याचा राजा, घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा’ असो की ‘वादल वारं सुटलय गो, वाऱ्यानं तुफान उठलाय गो’ सारखी कित्येक गीत खूप लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटात अनेक बहारदार गीत संगीत आहे. राजेशाही नौका, शिकारा, शिडाचे जहाज, होडी, नाव, पडाव ते यांत्रिक बोटीपर्यंत सर्वाचे काळानुरूप चित्रण त्यात पहावयास मिळते.
होडीतील गीत म्हटल की ‘बैजू बावरा’ सिनेमा आठवतो. नदी पात्रात नावेत बसलेली नायिका (मीना कुमारी) आणि काठावर ‘तू गंगा की मौज मै जमना की धारा, हो रहेगा मिलन ये हमारां तुम्हारा रहेगा मिलन’ गाणारा नायक (भारत भूषण) हे दृश पाहायला सारा गांव लोटलेला. (रफी/लता. संगीत नौशाद) अभिनेता राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर अभिनित ‘अमर प्रेम’.
कोलकत्ता येथील हावडा ब्रीजच्या पार्श्वभूमीवर हुबळी नदीत नायक नावेत बसून शांत प्रवाहात, ’चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाये, सावन जो आग लगाये तो उसे कौन बुझाये’ गातोय. (किशोर कुमार, गीत आनंद बक्षी संगीत आर डी बर्मन). राजेश खन्ना आणि वहिदा रेहमान यांचा सुंदर अभिनय असलेला ‘खामोशी’ हा असाच एक चित्रपट. ‘वो श्याम कुच अजीब थी ये श्याम भी कुच अजीब है’ गुलजार यांनी लिहिलेले आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील गंभीर गाणं काळजात घर करते.
सुनील दत्त आणि नूतन अभिनीत ‘मिलन’. मुकेश व लता यांच्या आवाजातील ‘सावन का महिना पवन करे शोर जीरह झुमे ऐसे जैसे बन मे नाचे मोर’, तर वेड लावून जाते. गोदावरी नदी पात्रातील ही प्रेम नैया पाहत किती पिढया हे गाणं गुणगुणत आहेत. (शब्द आनंद बक्षी. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल) किशोर कुमार मधुबालाचे अवखळ मनमुराद हसविणारे, ‘चलती का नाम गाडी’ तील ‘हाल कैसा है जनाब का, क्या खयाल है आपका, यु तो मचल गये तो हो हो हो, यु ही फिसल गये आ आ आं’ गीत. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या गीताला एस डी बर्मन यांनी सजविले आहे. शब्द मजरूह सुलतानपुरी.
तर ‘काश्मीर की कली’ सिनेमातील, ‘ये चांद का रोशन चेहरा, जुल्फो का रंग सुनहेरा, ये झील की निली आंखे कोई राज है इनमे गहरा .. रफी चा आवाज. दल लेकच्या पार्श्वभूमीवर ‘शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर’ यांचा रंगीत अभिनय, वा ! काय बहारदार गीत आणि त्याचे ते चित्रण. संगीत ओपी नय्यर. ‘संगम’ राजकपूर आणि वैजयंतीमाला यांचा ‘बोल राधा बोल संगम होगा की नही’ साठी लक्षात आहे. ‘ओ महबूबा तेरे दिलके पास ही है मेरी मंजिल ए मकसूद..’ मोटार बोटीत बसून दूर जाणाऱ्या राधाला मारलेली हाक, कोण विसरणार.
मुकेश लता यांचा स्वर. शब्द हसरत जयपूरी. संगीत शंकर जयकिशन. ‘जिंदगी के सफर मे अकेले थे हम, तुम मिले तो दिल को सहारा मिला’ हे असेच एक सुंदर गीत. सुनील दत्त आणि नंदा यांच्यावर चित्रित. रफी यांच्या आवाजात मनाला झकझोर करते. चित्रपट नर्तकी.शब्द शकील बदायुनी. संगीत रवी. तर ’आग पाणी मे लगी’ हे सुनील दत्त आणि वैजयंतीमालावर अभिनित विस्मृतीत गेलेलं गीत. चित्रपट झुला.आवाज रफी/लता. संगीत सलील चौधरी. लता आणि मुकेश यांच्याच आवाजात ‘अनाडी’ चित्रपटाचे ‘दिल की नजर से नजरोकी दिलसे ये बात क्या है ये राज क्या है कोई हमे बता’ दे’ हे मधुर गाणं कानावर पडताच श्रोते मंत्रमुग्ध होतात. राज कपूर आणि नूतन यांचा देखणा अभिनय. शैलेन्द्र यांचे गीत शंकर जयकिशन यांनी सजविले.
काश्मीर पार्श्वभूमीवरचा
‘जब जब फुल खिले’ लक्षात राहतो तो ‘रफी’ यांच्या आवाजातील ‘परदेशीओ से ना आंख मिलाना..या गीतामुळे. शशी कपूर आणि नंदा यांचा सुंदर अभिनय. कल्याणजी आनंदजी यांच संगीत. ‘माझी नैया धुंडे किनारा’ हे ‘उपहार’ सिनेमातील गीत. मुकेश यांचा आवाज. कलाकार जया भादुरी आणि स्वरूप दत्त.
(गीत आनंद बक्षी. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल) काही आठवतं.? ‘ओ माजी रे अपना किनारा, नदिया की धारा है’ हे खुशबू सिनेमातील जितेंद्र वर चित्रित किशोर कुमार गायलेले गीत, नावाप्रमाणेच खुबसुरत आणि श्रवणीय. तर ‘दिन है बहार के तेरे मेरे इकरार के दिल के सहारे आजा प्यार करे’ खूपच श्रवणीय आहे. गंगा नदीच्या पात्रात शर्मिला टागोर आणि शशी कपूर ग्रुप वर चित्रित हे गीत आजही ताजे वाटते.
‘वक्त’ सिनेमातील हे गीत महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायले आहे. शब्द साहिर लुधियानवी आणि संगीत रवी. ‘ये हवा ये नदी का किनारा ये चंचल हवा’, ‘घर संसार’सिनेमातील राजेंद्र कुमार आणि कुमकुम वर चित्रित एक अप्रतिम गीत. आवाज मन्नाडे. शब्द मजरूह सुलतानपुरी. संगीत रवी. काहीसे विस्मृतीत गेलेले.’ओ माझी चल ओ माझी चल’ तू चले तो बाजे मौजों की झम झम पायल’ हे रफी यांनी गायलेले धर्मेंद्र आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित गाणं. नदी बरोबर जीवनाची तुलना करणारे हे गीत आनंद बक्षी. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सजविलेले आहे. तर दिल अपना प्रीत पराई सिनेमातील ‘अजीब दास्तां है ये, कहां शुरू कहां खतम, ये मंजिलें हैं प्यार की, न वो समझ सके ना सके हम’ आजही लोकप्रिय गीत आहे.
मीनाकुमारी आणि राजकुमार, नादिरा यांच्यावर चित्रित, लता मंगेशकर यांनी गायलेले, शैलेन्द्र लिखित आणि शंकर जयकिशन संगीत दिलेले अजरामर गीत आहे. या गीताबरोबरच सचिन बर्मन यांच्या आवाजातील धीरगंभीर असे सुजाता सिनेमातील ‘सुन मेरे बंधू रे सुन मेरे मितवा, सुन मेरे साथी रे’ कायमचे लक्षात राहते. शब्द मजरूह सुलतानपुरी.
अभिनेते उत्तम कुमार आणि शर्मिला टागोर वर चित्रित अमानुष सिनेमातील ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा, बरबादी की तरफ ऐसा मोडा, एक भले माणूस को अमानुष बना दिया’ एक अप्रतिम दुखरे गीत. आवाज किशोर कुमार. तर ‘आदमी मुसाफिर है आता जाता है’ हे लता आणि रफी यांच्या आवाजातील गोड गाण म्हणजे जीवांचा तत्वतच सांगते. चित्रपट अपनापन. कलाकार जितेंद्र रीना रॉय, सुलक्षणा पंडित. ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’ हे ‘अभिताभ बच्चन, झीनत अमान’ यावर चित्रित रोमेंटिक गाणे. आशा भोसले आणि शरद कुमार आणि अभिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकताना मजा येते. संगीत आरडी बर्मन. चित्रपट ग्रेट गँम्ब्लर.
अभिताभ बच्चन आणि नूतन यांनी सजविलेला सौदागर आठवतो. ‘दूर है किनारा गहरी नदी की धारा तुटी तेरे नैया माझी कैसे जाओगे’ खूपच अर्थपूर्ण आहे. मन्नाडे याचे धीर गंभीर सूर आणि रवींद्र जैन यांचे संगीत. कधी तरी ऐकलेच पाहिजे.
खरंतर शेकडो गाणी आहेत. सोपी, मधाळ, संदेश देणारी सुंदर चित्रित झालेली. काही विस्मृतीत गेली. काही आजही कानावर पडताच आठवणी जागे करतात.
– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.