Wednesday, July 2, 2025
Homeकलाचित्रगीत

चित्रगीत

सप्टेंबर महिन्यातील तिसरा आठवडा जागतिक कर्णबधिर आठवडा म्हणून साजरा केला जातो. म्हणून यावेळच्या चित्रगीत सदरासाठी “अपंगत्व यावरील गीतं“, या विषयाची निवड करण्यात आली आहे.
…………….संपादक

कर्णबधिरता, तोतरेपण, अडखळत बोलणे, उच्चारातील दोष, बोबडेपणा आणि आवाजातील विविध दोष काही व्यक्तीत आढळून येतात. त्याबरोबरच बहुविकलागता असलेल्या अंधत्व किंवा मतिमंद व्यक्तीत बहिरेपणा व भाषा दोष कमी अधिक प्रमाणात आढळतो. अपंगत्व विषयावर इंग्रजी व हिंदीसह सर्वच भाषांमध्ये अनेक चित्रपट आहेत.

हेलन केलर या सुप्रसिद्ध अंध – कर्णबधिर व्यक्तीच्या जीवनावरी ‘मिरकल वर्कर’ पासून, संजीव कुमार जया भादुरी यांच्या अभिनयाने सजलेला कोशिश, नाना पाटेकर, सीमा विश्वास, हेलन यांचा “खामोशी” आणि नसरुद्दीन शहा आणि श्रेयस तळपदे यांचा “इकबाल” यांचा समावेश आहे.

अभिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा अभिनय असलेल्या ‘ब्लॅक’ ने (2005) प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यातील अंध कर्णबधिर मुलगी साइन लँग्वेजमध्ये गाणं म्हणते-
मौसम की अदला बदली मे पवन गुलाबी हो जाती है/ये मैने छुकर देखा है/ रात सरककर चलते चलते बिलकुल आधी हो जाती है/हा मैने छुकर देखा है … हेलन केलर आणि त्यांची शिक्षिका सुलेवान यावर आधारित या सिनेमात अभिताभ यांनी शिक्षक आणि राणीने त्याची विद्यार्थिनी साकारली आहे.

खामोशी दि म्युझिकल या चित्रपटातील नायक देखील कर्णबधिर आहे.तो बोलू शकत नाही. या चित्रपटातील मनीषा कोईराला या अभिनेत्रींवर चित्रित, ‘ये दिल सून रहा है/’तेरी दिल की जुबा’ हे गीत खूपच सुंदर आहे. कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या गीताला जतीन ललित यांचे संगीत आहे. गीत मजरूह सुल्तानपुरी यांनी लिहिले आहे.

नसरुद्दीन शहा आणि श्रेयस तळपदे यांनी अभिनय केलेला “इकबाल” सिनेमा क्रिकेटवर आधारीत आहे. कर्णबधिर असलेला युवा खेळाडू आणि प्रशिक्षित करणारा प्रशिक्षक यावर ही कथा आधारित आहे. या संघर्षमय कथेत आशाये/कुछ पाने की हो आस आस/ हर कोशीश हो बार .. हे गीत खूप भावते.

विकी कौशल्य यांनी अभिनित केलेला तोतरेपणावर आधारित “जुबान” असो की “बर्फी,” माय नेम इज खान, कोई मिल गया, आंखे, सदमा या चित्रपटांनी कर्णबधिरता, सेराबल पालसी, अंधत्व यावर जनजागृती करण्यात मोठे योगदान दिले.

“तारे जमीनपर” सारख्या चित्रपटातून तर लर्निंग डीसअबिलिटीवर छान प्रकाश टाकला. त्यातील खो ना जाये तारे जमीनपर हे गीत मुलांबाबत पालकांना खूपच काही शिकवून जाते.

अपंगत्व विषयावरील चित्रपट म्हटलं की काही जुने सिनेमा आठवतात. त्यात दोस्ती (1964) त्यातील गीत संगीतामुळे विशेष स्मरणात आहे. शारीरिक अपंग असलेला रामू (सुशीलकुमार सोमय्या) आणि अंध असलेला मोहन(सुधीर कुमार सावंत) या मित्राची गोष्ट. एक बाजा वाजवतो तर दुसरा गोड आवाजात गाणी गात एकमेकांना मदत करतात. या चित्रपटातील-
‘मेरी दोस्ती मेरा प्यार/ कोई जब राह न पाये/मेरे संग आये/के पग पग दीप जलाये/मेरी दोस्ती मेरा प्यार/
रफी यांनी गायलेलं हे गीत आजही सिनेरसिकांच्या मनात घर करून आहे. गीतकार होते मजरूह सुलतान पुरी. आवाज अर्थात मोहमद रफी. या सिनेमाचे दुसरे गीत तर खूपच भावपूर्ण. ‘जानेवालों जरा मुडके देखो मुझे/एक इसांन हूं मैं तुम्हारी तरह/जिसने सबको रचा, अपने ही रूप से/उसकी पहचान हूं,मैं तुम्हारी तरह/ ..हे गीत अपंग व्यक्तीविषयी विचार करायला भाग पाडते.

‘तेरी आंखों के सिवा दुनिया मे रखा क्या है’ हे चिराग चित्रपटातील गीत असंच भावविभोर करते. अंध असलेली प्रियतमा आशा चिबर (आशा पारेख) आणि अजय सिंग (सुनी दत्त) यांची कहाणी. जीवनात आलेले पराभव आणि ट्रेजेडीवर मात करीत आशावाद सांगणारी ही चित्तरकथा मो. रफी आणि लताजींच्या आवाजातून सुरेख चितारली आहे.

आमिर खानचा ‘लगान’ सर्वानाच आवडला. त्यातील नाच गाणी आणि कथा भाव खाऊन गेले. पण सर्व व्यक्तिरेखात कचरा या अपंग खेळाडूची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. कचरा एक हाताने अधू आहे. पण तोच आपल्या स्पिन गेंदबाजीने आमिरच्या क्रिकेट टीमला विजय मिळवून देतो. त्यातील ‘चले चलो हे प्रेरणा गीत अपंग व्यक्तीच्या क्षमतेबाबत जणू भाष्य करते.
‘चले चलो ..बार बार हा/ बोलो यार हा/अपनी जीत हो/उनकी हार हा/कोई हमसे जीत ना पाये/चले चलो/मिट जावे जो टकरावे /चले चलो ..
जावेदअख्खतर यांनी लिहिलेल्या या गीताला ए. आर रहेमान यांनी संगीत दिले आहे.

कोशिश (2020) नावाच्या चित्रफीतील मुलगी म्हणतेय, लहरो से डरकर कोई नौका पार नही होती/कोशीस करनेवालों की कभी हार नही होती’.

प्रशिक्षण, संधी आणि प्रोत्साहन मिळाले तर अपंग खेळाडू काय कामगिरी करू शकतात हे नुकत्याच संपन्न झालेल्या पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूनी 19 पदके मिळवून दाखवून दिले आहे.

शरिराचा एखादा अवयव निकामी किंवा दुर्बल झाला म्हणजे संपूर्ण शरीर निकामी झाले असे होत नाही. प्रयत्न, कष्ट, अभ्यास, जिद्द आणि दुर्दम्य आशावाद या व्यक्तीच्या पंखात बळ भरतो. अशी अनेक माणसं आज आपल्या कर्तृत्वाने उंच शिखरावर कार्यरत आहे. त्यांच्या विषयी सहकार्याची भावना, प्रेम, आदर त्यांना पुढे जाण्यास मदत करते. आपण सर्व त्यात सामील होऊ या.

डॉ. त्रंबक दूनबळे

– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हृदय स्पर्शी गीते, अपंगत्वावर भाष्यकरणारे भावना प्रधान प्रसंग तसेच जादूई संगीत उत्कृष्ट अभिनय उत्तम दिग्दर्शन यामुळे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून
    बसलेले चित्रपट आणि आपली ओखवती लेखन शैली
    आपण मांडलेल्या संवेदनाक्षम प्रश्नाकडे लक्ष वेधले जाते. सामाजिक जाणिवेतून सतर्कता वाढीस लागते
    प्रेरक, प्रेरणादायी भाष्य. धन्यवाद साहेब आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४