Wednesday, July 2, 2025
Homeकला'चित्रसफर' ( १० )

‘चित्रसफर’ ( १० )

वंडरगर्ल वर्षा
“मी आले निघाले सजले फुलले फुलपाखरू झाले वेध पंखाला आला असा आल्या या लहरी घेतली भरारी तूफाना वरती बेभान मी झाले” असे म्हणत वर्षा उसगावकरचे ‘गंमत जमत’ द्वारे दमदार आगमन झाले.

हा चित्रपट सचिन ने दिग्दर्शित केला. त्यात स्वतः सचिन आणि अशोक सराफ हे पण होते. अशा मोठ्या
नटांपुढे नवखी वर्षा कुठे ही कमी पडली नाही. हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. वर्षाने पहिल्याच चित्रपटात अशी दमदार भूमिका केली की ती मराठीतील स्टार झाली !

वर्षा चा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोव्यात झाला. तिचे वडील गोव्यातील मोठे राजकारणी. असा समृध्द कोकणी परिवार लाभलेल्या वर्षाला
लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

वर्षाने सर्वप्रथम 1984 ला ब्रम्हचारी या नाटकातुन सुरवात केली. जे तुफान चालले. प्रशांत दामले बरोबर तिची जोडी छान जमली. ‘गंमत जमत’ ने ती रातोरात स्टार झाली. तिच्यात सौंदर्य आणि अभिनय याचा सुंदर मिलाप होता. यानंतर सगळीकडे बोंबाबोब, भुताचा भाऊ, आमच्यासारखे आम्हीच, आत्मविश्वास असे अनेक हिट मराठी चित्रपट तिने दिले.

हे करता करता तिने दूरदर्शन वरील बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मध्ये उत्तरा चा रोल करून सर्वांची वाहवा मिळवली. 1994 च्या चंद्रकांता मालिकेत तिने राणी चा रोल केला. तसेच सोनी टिव्ही च्या ‘आहट’ मध्ये पण तिने काम केले. यावरून एक लक्षात येते की, तिने कोणतेही माध्यम लहान अथवा मोठे मानले नाही. मराठीत टॉप ची हेरॉईन असताना टिव्ही पन केला. तिचे हे रोल पाहून तिला हिंदीत पण ऑफर्स येऊ लागल्या. दूध का कर्ज यातुन तिने हिंदी चित्रपटात सुरुवात केली. यात तिचा नायक जॅकी श्रॉफ होता. रिजनल टिव्ही बॉलीवूड आणि मराठी सिनेमा या सर्वांना वर्षाने गंभीरपणे घेतले आणि ती हिंदीत पण नाव कमवू लागली.

नाना पाटेकर आणि राजकुमार समवेत तिरंगा या हिट सिनेमाची ती नायिका होती. तसेच साथी या महेश भट च्या सिनेमात आदित्य पंचोली आणि मोहसिन खान यांच्या बरोबरीने जबरदस्त रोल केला. यातील गाणी आजही हिट आहेत. हप्ता बंद, सोने की जंजीर, परवाने, हस्ती, खलनायिका, हनिमून असे अनेक हिंदीत रोल केले. यातील काही चालले. काहीं नाही चालले. पण वर्षाने तिचा रोल उत्तम रित्याच केला.

वर्षाच्या बाबतीत अजून एक म्हणजे तिला बोल्ड पण मानले गेले. ती म्हणते, प्रेक्षकांचे मनोरंजन झाले पाहिजे. मराठीत पण तिने संजय सुरकर दिग्दर्शित यज्ञ हा वेगळा चित्रपट करून आपण पण एक सशक्त अभिनेत्री आहोत हे दाखवून दिले. त्याच बरोबरीने “सवत माझी लाडकी” यातीलही तिचा रोल लक्ष वेधून घेतो.

अशी ही वर्षा आज 54 वर्षांची झाली पण अजूनही फिट आणि ग्लॅमर टिकवून आहे. महापूर या नाटकातील भूमिकेसाठी आंतरराज्य नाट्य सुवर्णपदक तिला मिळाले आहे .

मुंबई ते मॉरिशस, लपंडाव, नवरा बायको, तुझ्यावाचून करमेना, हमाल दे धमाल अशा अनेक चित्रपटातून वर्षा उसगावकर ही कायम लक्षात राहते आणि राहणार .शेवटी जाता जाता एकच सांगावेसे वाटते, भलेही वर्षाजी 54 वर्षाच्या झाल्या, पण आजही त्यांचा अभिनय बोलका आहे. न बोलताही त्यांचा चेहरा बरेच काही सांगून जातो. त्यांना पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹

संदीप भुजबळ

– लेखन : संदिप भुजबळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. तुम्हीं खुप सुंदर चित्रसफर घडवुन आणता वर्षा उसगावकर विषयी खुप सुंदर माहिती तुमच्या लेखातून मिळाली धन्यवाद🙏🙏

  2. चित्रसफर मधे वर्षा उसगावकर बद्दल वाचून अनेक आठवणी जाग्या झाल्या.लेख छानच आहे.गंमत जंमत हा चित्रपट माझी बहीण शर्मिला आणि तिचे पती सतीश कुलकर्णी यांची निर्मिती होती.तो चित्रपट खूप गाजला.वर्ष ही अभिनेत्री सर्वांची आवडती झाली.पुढे सतीश कुलकर्णी यांनी ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा चित्रपट काढला.त्यात सचिन सुप्रियाचे लग्न ठरले.

    पुढे वर्षा बरोबर मला एक चित्रपट करायला मिळाला.
    त्याचे नाव ‘लढाई.’वर्षाची यात dashing भूमिका आहे.
    जरूर पहावा.

  3. वर्षा उसगावकर या मराठीमधल्या उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांचं वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन आणि आगामी जीवनासाठी गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा..!
    … प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील