Wednesday, June 18, 2025
Homeकला'चित्रसफर' ( ६ )

‘चित्रसफर’ ( ६ )

अलविदा के के
गायक के के यांच्या अचानक जाण्याने एका युगाचा अंत झाला असे म्हणता येईल. संगीताचे कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता आपल्या भारदस्त आवाजाने रसिकांना भुरळ पाडणारे गायक के के नव्वदीच्या दशकातील एक अग्रगण्य गायक होते. जवळपास 10 भाषेमध्ये त्यांनी गाणे गायले होते. 1995 पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण 1999 चे हम दिल दे चुके सनम यातील ‘तडप तडप’ या गाण्यापासून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. आजही प्रेमात हताश झालेले प्रेमी युगल याच गाण्याचा सहारा घेतात.

कृष्णकुमार कुन्नाथ असं त्यांचं पूर्ण नाव होत. २३ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांनी कॉमर्स ची पदवी मिळवली. त्यांच्यावर
लहानपणापासुनच किशोरकुमारचा आवाज आणि राहुलदेव बर्मन चे संगीत याचा खूप मोठा प्रभाव होता. किशोरदा प्रमाणे संगीत न शिकता त्यांनी या संगीत क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवले.
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्यांनी ३५०० जिंगल्स बनवले होते. १९९४ साली ते मुंबईत आले आणि कायमचे मुंबईकर झाले. प्रेमाने ते के के या नावानेच संबोधल्या गेले आणि त्याच नावाने प्रसिध्द झाले.

के केने हिंदी ,तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटातील गाणी आपल्या गायनाने सजवली. हिंदीत १९९७ च्या माचिस मधून संगीतकार विशाल भारद्वाज ने “छोड आये हम ओ गलिया” यातून त्यांना संधी दिली.यात हरिहरन, सुरेश वाडेकर हे पण होते. जे बरेच गाजले.

ए आर रहमान ने संगीत दिलेल्या “हम दिल दे चुके सनम” मधील “तडप तडप के इस दिल से आह निकलती है” हे सलमान खान साठी के के ने गायलेले गाणे टर्निंग पॉईंट ठरले. त्यानंतर केकेने मागे वळून पाहिले नाही. आणि त्यांनी एकापाठोपाठ एक सुपरहिट गाणी दिली.

के के ने जी पण गाणी गायली, ती हिट झाली. बॉलीवुड मध्ये धमाका करणारी केके यांची सर्वोकृष्ट गाणी ‘यारो’, जिंदगी दो पल की, खुदा जाने की, तड़प तड़प के इस दिल से, जरा सी दिल में दे जगह तू, दिल इबादत कर रहा है, दस बहाने करके ले गए दिल, आंखों में तेरी अजब सी. आवरापण बंजारापन ये खला है सिने मे अशी अनेक आहेत.

1999 च्या worldcup साठी टीम इंडिया साठी के के ने गाऊन सर्वात जोश आणला होता.

के के ने 1991 ला आपली बालपणीची मैत्रीण ज्योती बरोबर विवाह केला होता. तिने संघर्षाच्या काळात के के ना खूप साथ दिली.

इम्रान हाश्मी साठी के के ने खूप सुपरहिट गीते गायली.
तू ही मेरी शब है। जरा सी दिल मे तू जगह। सोनिये हिरिये तेरे बिना मेरी सुबह नही होती। हे तरुणांना आजही आवडते. आशिकी 2 मधील ‘तेरी खता है मेरे जिया नंतर पिया आये ना ‘असे गाणारा के के लाजवाबच !
केके ने गायलेल्या गाण्यांपैकी बहुतांशी गाणी ही सुपरहिट होती. प्रत्येक गाणं वेगळ्या स्टाईल ने होते. प्यार के पल, यारो दोस्ती, तू हैं आस्मान में, दिल को चुराया तुने सनम, बीते लमहें, जिंदगी दो पल की, आंखों मे तेरी, दस बहाने, तडप तडप के, दिल क्यों ये मेरा, जरा सी दिल में, सजदे किये हैं लाखों, लबो को लबो से ।सच कह रहा है मेरा दिल। खुदा जाने मै फिदा हु ।क्या मुझे प्यार है। तू ही मेरी शब है ।क्या मुझे प्यार है । आणि माझे त्याचे सर्वात आवडते गाणे जिस्म मधील आवरापन बंजारापन ये खला है सिने मे। अशी एकाहून एक सरस गाणी केके ने दिली.

संगीतकार प्रीतम सोबत केके चं जबरदस्त ट्यूनिंग होतं. सध्याच्या अरिजित सिंग सारख्या नव्या दमाच्या गायकानंतर केके ला फारशी गाणी मिळत नसल्याने तो कॉन्सर्ट जास्त करायचा. तरी काही महत्त्वाचे गाणे असले की संगीतकारांची पहिली पसंती के के ला असायची. ज्या सलमानचे 1999 तडप तडपके ने के के ची सुरवात झाली त्याच सलमानचे टायगर 3 साठी शेवटचे गाणे 2022 ला काही दिवस अगोदर रेकॉर्ड केले. पण जी काही गाणी त्याला मिळत होती ती त्याच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी पुरेशी होती. असेच त्याचे गाणे होते.

९० च्या दशकात कुमार सानू, उदित नारायण , सोनू निगम, लकी अली, मोहित चौहान प्रमाणे केके चं सुद्धा संगीत क्षेत्रात स्वतःच अस्तित्व होतं. खुदा जाने मै फिदा हु या गाण्यासाठी त्याला 2008 चे बेस्ट सिंगर चे अवॉर्ड मिळाले. 15 ते 20 वेळा त्याचे नामांकन झाले होते. पण अवॉर्ड 2 वेळा मिळाले. असा हा सुंदर आवाजाचा गायक 31 मे 2022 ला कलकत्ता येथे live concert करायला गेला होता. 20 गाणी गाणार होता. पण 13 ते 14 गाणी गायल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. प्रत्येक गाण्याला रसिकांचा खूप प्रतिसाद मिळत होता. पण प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आणि भरमसाठ गरमीने के के खूपच अस्वस्थ झाला. के के ला हॉटेलच्या रूममध्ये नेले. पण त्याची प्रकृती जास्त खराब झाली. त्यातच हार्ट अटॅक ने के के चा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी के के सर्वाना सोडून गेला होता. हा फिल्म इंडस्ट्री साठी मोठा धक्का होता.

महान संगीतकार राजेश रोशन, के के ला नवीन पिढीतील किशोरदाच्या तोडीचा गायक आहे, असे त्याची गायकी पाहून बोलले होते. किशोरदा पण त्यांचे काळी गायकीत 1 नंबर होते. नवीन गायक हे के के ला कॉपी करत असत. फक्त गाणे गाणे हेच के के ने शेवटपर्यंत केले. तो कधीही कोणत्या गॉसिप मध्ये सहभागी झाला नाही की अडकला नाही.

असा के के महान कलाकार होता. ग्रेट सिंगर अभिजित हे के के चा मी सर्वात मोठा चाहता आहे, असे अभिमानाने सांगतात. अश्या हरहुन्नरी गायकाची एकझिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन पिढीचा आवडता गायक केकेचा दुर्दैवी मृत्यू झाला पण ज्या परिस्थितीत तो गेला त्यामुळेच माझ्याप्रमाणे सर्व रसिकांना जास्त हळहळ वाटली. तुम्ही बोलाल या जर तर च्या गोष्टी आहे. अंतिम सत्य हे आहे की रफी, किशोर, मुकेश या तुफान लोकप्रिय त्रिकुटासारखाच केके अवेळी, पन्नाशीत जग सोडून, त्याच्या फॅन्सना रडवून गेला.
केके ला भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

संदीप भुजबळ

– लेखन : संदिप भुजबळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. के.के.च्यां जाण्याने संगीत क्षेत्राची खूप मोठी हाणी झाली,माणसाचे जीवन क्षण भंगूर आहे 😞🥲, लिखाण चांगल केल आहेस .भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  2. एवढ्या कमी वयात के.के.आपल्यला सोडून गेले याचं खुप दु;ख होतय.ते गेले तरी त्यांच्या गान्याच्या रूपाने ते रसिक मनात कायम घर करून राहतील .
    त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली 🌹🌹🌹 🙏🏻🙏🏻
    धन्यवाद।

  3. खूपच छान संदीप भैय्या ,सुंदर लिखाण आहे के.के.यांचे बाबत ची संपूर्ण माहिती व्यक्तिमत्त्व पूर्ण उलगडले आहे,असाच प्रयत्न कायम तुझ्या कडून कायम होवो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा