नमस्कार मंडळी.
आजच्या “कविता” सदरात आपण स्वागत करू या जेष्ठ, श्रेष्ठ कवी प्रा.अशोक बागवे यांचे.
प्रा अशोक बागवे यांनी त्यांचे चित्र काव्य “शब्द” हे आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यासाठी देणे हा आपल्या पोर्टल चा बहुमान आहे. या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे. आजचे “शब्द” हे चित्र काव्य चित्रकार श्री विष्णू थोरे यांनी चितारले असून त्यांचेही मनःपूर्वक आभार आणि न्यूज स्टोरी टुडे परिवारात स्वागत आहे.
अल्प परिचय
प्रा.अशोक बागवे यांचे शिक्षण, एम.ए., डि.एच.ई., बी.ए.आणि एम.ए. मुंबई विद्यापीठ (गोल्डमेडलिस्ट) इतके झाले आहे.
प्रा अशोक बागवे गेली ४४ वर्षे अखंडपणे लिहीत असून आता पर्यंत ३४ कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.कदाचित हा एक विक्रमच म्हणावा लागेल. या शिवाय त्यांचे सृजनसावली, काय वर्णावी ती गोडी..! , बोरू म्हणे, दृष्टी सृष्टीचे आगर अशी ४ ललित गद्य पुस्तके प्रकाशित झाली असून गाणी..अशी कहाणी..! हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. “माझ्या झेन कथा” हा कथा संग्रह, “प्रिय सालस” ही कादंबरी, ५ नाटके, १० एकांकिका, ४ समीक्षा ग्रंथ, काही वृत्तपत्रात सदर लेखन प्रसिद्ध झाले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी कविता-1977, कवितारंग या दोन पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. दूरदर्शन व आकाशवाणी वरील अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत.
प्रा अशोक बागवे यांनी ८४ व्या, ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रित कविसंमेलनांचे अध्यक्ष पद (ठाणे/चिपळूण) आणि अमळनेर येथे झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनातील परिसंवादाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
“पसायदान-कालचे व आजचे” वर त्यांनी 400 व्याख्याने दिली आहेत.
सी बी एस इ बोर्डच्या दहावी (मराठी) पाठ्यपुस्तकात..”माझा मराठीचा बोल..” ही त्यांनी कविता समाविष्ट असून १० सी, डी.८ मालिकांची शीर्षक गीते चार दिवस सासूचे, अशक्य, फक्त तुझ्यासाठी आणि अचानक, अकल्पित, आई छुमछुम छननन, एस युवर ऑनर या ८ मालिकांची शीर्षक गीते लिहूनच ते थांबले नाहीत तर “श्रीमंताची लेक..” या सह्याद्री वाहिनीवरील दूरदर्शन मालिकेत चक्क भूमिका देखील केली आहे. या बरोबरच अवघा रंग एकचि झाला, संन्यस्त ज्वालामुखी, जन्मगाठ, रघुपती राघव राजाराम, संगीत शंकरा चि.सौ.कां.रंगभूमी (घासीराम कोतवाल..(हिंदी), विश्वनायक.. (हिंदी) या नाटकांसाठी तसेच अनुराधा, संकल्प, शर्यत, बोकड, खेळ मांडिला, पोरका, गोजिरी, मुक्काम पोस्ट लंडन, रास्ता रोको, सर्जा राजा, संदुक, जगावेगळी पैज, सत्या, प्रेमाचा रंग, मन,ध्रुव आणि मी या चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे.
प्रा अशोक बागवे यांना आता पर्यंत महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाचा कवी केशवसुत पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाचा बालकवी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतकारासाठी ग दि मा पुरस्कार असे ३ पुरस्कार, को म सा प चे “कविता राजधानी” कवी आरती प्रभु हे २ पुरस्कार, म सा प चा कवी ना घ देशपांडे पुरस्कार (गेय कवितेसाठी ), जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून झी गौरव पुरस्कार या प्रमुख पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

— रचना : प्रा अशोक बागवे
— चित्र : विष्णू थोरे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
I strongly believe in Destiny.
And Life changing events take place accidentally. PROFESSOR ASHOK BAGVE MET ME AS A PATIENT ,AND WE BECOME FRIENDS.
TO meet him ,as a patient, was a Destiny. I am very proud of him ,his contribution to society.May God keep him inspire and healthy in years to come.
सविस्तर सुंदर परिचय ! अशोक बागवे हे माझे समकालीन कवी आहेत म्हणून मला त्यांचा खूप अभिमान आहे !
अशोकजी बागवे हे मराठीतील श्रेष्ठ व ज्येष्ठ कवी आहेत.गेली पन्नास वर्षे ते कविता लिहित आहेत..
कवितेत त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत.त्यांच्या कार्याला सलाम!