कभी अलविदा न कहना …
राहुरी येथील आमचे मित्र, अविनाश ठाकूर यांच्या गुहा येथील शेतावर मुक्तांगण पाठपुरावा व जनजागृती कार्यक्रम नुकताच झाला. खुप छान उपस्थिती व नियोजन होते. शेवटी मी “पल पल दिल के पास” हे गीत सादर केले.
मा. दत्ता सर माझ्या विषयी खूप छान बोलले. अविनाशजी, नितीन सर, अमोल सर, भास्करजी जाधव, रवींद्रजी ठाकूर, श्री व सौ झरेकरजी, ललित गोयलजी, विजयजी रोहकले, हेमचंदजी साखरे, सर्व मुक्तांगण मित्रांनी दाद दिली. कोरोनानंतर दोन वर्षांनी झालेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात कार्यक्रम पार पडला.
हे सर्व सांगण्याचा हेतू म्हणजे, माझे दीड वर्ष पूर्वी कॅन्सर झाल्याने तोंडाचे मोठे ऑपरेशन झाले. डॉक्टर म्हणाले की, बोलायला पण त्रास होईल, गाणे तर खूप दूरचे आहे. पण इच्छाशक्तीने मी पुन्हा गायलो.
खरे तर ही सर्व किशोरदाचीच कृपा मानतो. त्यांच्याच आशीर्वादाने मला हे गायचे पाठबळ मिळाले.
किशोरदाच्या “चलते चलते” ह्या गाण्यात “कभी अलविदा ना कहना” असे बोलतो. याचा प्रत्यय मला कायम येतो. जरी शरीराने ते आपल्यात नसले तरी माझ्या सारख्या अनेकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळते.
दुसरा एक प्रसंग म्हणजे, माझ्या मित्राचा वाढदिवस. त्यादिवशी मी जवळ जवळ 6 गाणी गायलो. सर्व मित्रांचा खूप छान प्रतिसाद मिळाला.
मी कॉलेज ला असताना, 1991 पासून किशोरदांची गाणी गातोय ते आजतागायत. जशी संधी मिळेल, तसे गातोय.
मित्रांनो, मला वाटले होते 19 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या इतक्या मोठ्या ऑपरेशन नंतर माझे गायन संपले असे वाटले. पण मी बरोबर 1 वर्षानी ऑक्टोबर 2021 पासून पुन्हा गातोय.
13 ऑक्टोबर 1987 ला किशोरदा आपल्यातून शरीररूपी निघून गेले तरी स्टेज वर गेल्यावर मला कायम प्रत्यय येतो की, ते आसपास आहेत. म्हणुनच मी “बीच राह मे दिलबर, बिछड जाये कही हम अगर और सुनी सी लगी तुमे ये डगर हम लौट आयेगे तुम युही बुलाते रहना कभी अलविदा न कहना” हे गीत नेहमीच अतिशय तन्मयतेने गातो.
गाण्याच्या निमित्ताने मला श्रोत्यांची साथ मिळत आहे, तर या लिखाणामुळे वाचकांनीही साथ मिळू लागली आहे .
आपली ही साथ अशीच राहू द्या.

– लेखन : संदीप भुजबळ. संगमनेर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
आपल्या मित्राच्या शेतावर झालेल्या एका कार्यक्रमात लेखकाने तोंडाच्या झालेल्या ऑपरेशननंतरही केवळ इच्छाशक्तीने गाणे सादर केले.ह्या जिद्दीचे वृत्तांकनही सुंदर.
खूप छान लिहीले आहेस,अर्थात प्रत्यक्षात तू ते करून दाखवलस म्हणूनच लिहू शकलास ,wel done ,keep it up👍👍👏👏👌👌
🌹खरंच दाद द्यावी 🌹
अभिनंदन प्लीज आपले 🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
Simply great👍👍
Very true 💖
कभी अलविदा न कहना ही माझी स्टोरी चित्र सफर चे नावाने खूपच सुंदररित्या आपण सादर केली .यापुढे ही मी असेच लेख आपणापुढे सादर करेल .आपले सर्वांचे अभिप्राय ही या लेख विषयी दयावे .आपला व आपल्या टीमचा मी आभारी आहे .पुढील वाटचालीस शुभेच्छा.