Tuesday, September 17, 2024
Homeकलाचित्र सफर : ३६

चित्र सफर : ३६

किशोरकुमार : नेमकी किती मराठी गाणी गायली ?

नमस्कार मंडळी.
लोकप्रिय गायक, अभिनेता किशोरकुमार याची काल जयंती होती. या निमित्ताने त्यांच्या वरील स्मृतीलेख किशोरकुमार यांचे परम चाहते श्री संदीप भुजबळ यांनी पाठविला होता. पण श्री प्रसाद जोग, सांगली यांनी लिहिलेला “यादे किशोरकुमारची” हा विस्तृत, सुंदर असा लेख आपण ४ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध केला असल्याचे श्री संदीप भुजबळ यांना कळविले असता, त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की, श्री जोग यांच्या लेखात “किशोरकुमार यांच्या नावावर फक्त एक मराठी गाणे आहे (गंमत जंमत या सिनेमामध्ये अश्विनी ये ना साथ – अनुराधा पौडवाल)” असा जो उल्लेख करण्यात आला आहे, तो चुकीचा आहे. वस्तुतः किशोरकुमार यांनी

१) अश्विनी ये ना – चित्रपट गंमत जमत सहगायिका अनुराधा पौडवाल,
२) तुझी माझी जोडी जमली – चित्रपट माझा पती करोडपती सह गायिका – अनुराधा पौडवाल
३) हा हा गोरा गोरा मुखडा, चित्रपट घोळात घोळ

अशी ३ मराठी गाणी गायली आहेत.

खरं म्हणजे, या बाबतीत मी श्री प्रसाद जोग यांना फोन ही केला होता. पण तो उचलल्या गेला नाही. म्हणून व्हॉट्स ॲपवर संदेश सुध्धा दिला आहे. पण अजून काही उत्तर आले नाही.

पोर्टल वरील लेख हे कायम स्वरुपी उपलब्ध असतात. अनेकदा काही व्यक्ती संदर्भ म्हणून, आवड म्हणून जुने लेख वाचत असतात. त्यामुळे मूळ लेखात दुरुस्ती करणे आवश्यक आहे जेणेकरून अचूक माहिती कायम राहील.

तरी कुणी जाणकार व्यक्ती, अभ्यासक सांगू शकेल का,की किशोरकुमार यांनी नक्की किती मराठी गाणी गायली आहेत म्हणून ? म्हणजे त्या नुसार मुळ लेखात यथोचित दुरुस्ती करता येईल.
धन्यवाद.
आपली
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न हे विकासाचे पहिले पाऊल आहे. टीम न्यूजस्टोरी यांचे हे पहिले पाऊल त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाणार, ह्यात काहीच संशय नाही. तुमचे सर्वांचेच हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments