Monday, July 14, 2025
Homeकला"चित्र सफर" ( ४ )

“चित्र सफर” ( ४ )

सुपरस्टार
पंजाब मधील अमृतसर येथील लाला हिरांनंद खन्ना यांच्या घरी 29 डिसेंबर 1942 रोजी एका बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव जतीन. पण परिस्थिती फारशी चांगली नसल्याने जतीन ला त्याचेच काका चुनीलाल खन्ना यांनी दत्तक घेतले आणि त्याचे राजेश असे नामकरण केले.

लहानपनापासूनच गुरुदत्त आणि दिलीपकुमार राजेश खन्नाचे आवडते कलाकार. आपणही असेच काहीतरी बनावे असे छोट्या राजेश ला वाटत असे. लहानपणी हायस्कूलला असताना, रवी कपूर जो पुढे जितेंद्र झाला त्याच्या बरोबर राजेश ची दोस्ती झाली होती. राजेशच्या वडीलाना त्याचे फिल्म विषयी आकर्षण आवडत नसे. पण काकांनी दत्तक घेतल्याने कशाची कमी नव्हती.

राजेश खन्ना वयाच्या 18 व्या वर्षीच स्पोर्ट्स कार चालवून ऑडिशन द्यायला जात असे. अशी महाग कार त्यावेळी स्टार्स पण वापरत नव्हते अशी कार राजेश खन्ना संघर्षाच्या काळात घेऊन फिरायचा. पण काही जमत नव्हते. कॉलेजच्या अनेक नाटकात रंगमंचावर काम करून त्याने बक्षिसे मिळवली.

युनायटेड प्रोड्युसर आणि फिल्मफेअर यांनी आयोजित केलेल्या फिल्मफेअर प्रतियोगितेत दहा हजारहून हुन जास्त स्पर्धक आले होते. त्यातून 8 जण निवडले गेले. त्यात राजेश प्रथम क्रमांकावर होता. प्रथम आल्यामुळे 1966 ला चेतन आनंद दिग्दर्शित “आखरी खत” या चित्रपटातुन त्याचे पदार्पण झाले. पण तो चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर “राज” आला. गाणे ठिकच होते. सोबत बबिता असूनही, जी यशस्वी अभिनेत्री तरी पण हा ही चित्रपट फ्लॉप. नंतर “औरत”, “बहारो के सपने” आले. हे चित्रपटही चालले नाही. तरी राजेश हताश झाला नाही.

1968 मध्ये शक्ती सामंत “आराधना” हा चित्रपट बनवत होते. पूर्णपणे नायिकाप्रधान असलेल्या या चित्रपटात राजेश खन्ना ला डबल रोलची संधी भेटली. ज्यावेळी “मेरे सपनो की राणी कब आयेगी तू” म्हणत सुजितकुमारच्या जोडीने राजेश खन्ना ची एन्ट्री झाली, त्यावेळी प्रेक्षकांनी थिएटर अक्षरशः डोक्यावर घेतले. प्रीमियर ला सर्व जण राजेश खन्ना ला शोधत होते. त्याने सर्वांना वेड लावले होते.
आणि एका “सुपरस्टार” चा जन्म झाला.

सुपरस्टार हा शब्दही तो पर्यंत कधीही, कोणासाठीही वापरला गेला नव्हता. चार फ्लॉप चित्रपटांनंतर पहिला ब्लॉकबस्टर देणारा असा सुपरस्टार. 1969 हे वर्ष
त्याच्यासाठी खूपच आशावादी ठरले. त्यानंतर “दो रास्ते” आला. तो पण सुपरहिट ठरला… 1969 ते 1971 सलग 17 सुपरहिट चित्रपट त्याने दिले जे रेकॉर्ड कोणी मोडू शकले नाही. यात आराधना, डोली, बंधन, इतेफाक, दो रास्ते, खामोशी, सफर, द ट्रेन, कटी पतंग, सच्चा झूठा, आन मिलो सजना, मेहबूब की मेहंदी, छोटी बहू तसेच आनंद आणि हाथी मेरे साथी हे सर्व सोलो 15 सुपरहिट तसेच अंदाज आणि मर्यादा हे खास भूमिकेतील अशा 17 चित्रपटांनी राजेश खन्ना क्रेझ निर्माण झाली.

“जिंदगी एक सफर है सुहाना” हे गाणे आणि राजेश खन्ना ला पाहण्यासाठी अंदाज ला गर्दी होत असे. त्यावेळी त्याचे “काका” हे नाव पण प्रचलित झाले होते. “उपर आका निचे काका” अशी त्याची इमेज होती.

राजेश खन्ना च्या महिला फॅन्स अशा होत्या की त्याची सफेद कार पूर्ण लाल होऊन जायची. रक्ताने पत्र येत असत. कितीतरी जणी त्याच्या फोटोशी लग्न करत.

आज इतक्या वर्षांनी सलीम खान म्हणतात, “आम्ही राजेश खन्ना इतकी लोकप्रियता कोणत्याच कलाकाराची पाहिली नाही, सलमानची पण नाही”.

राजेश खन्ना चा 1971 मध्ये आलेला “बदनाम फरिष्टे” फ्लॉप झाला. पण पुन्हा 1972 मध्ये “अमरप्रेम”, “अपना देश” “दुश्मन” “बावर्ची” “जोरु का गुलाम” “अनुराग” हे हिट झाले. 1973 ला दाग हा सुपरडुपर हिट झाला.

इथे मला एक नमूद करायचे आहे की, राजेश खन्ना सुपरस्टार झाला, यात सर्वात मोठा वाटा त्याच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांचा आहे. ते गाणे कोणत्याही मूडचे असो, जिंदगी का सफर, मेरे दिल मे आज क्या है, रूप तेरा मस्ताना…. तुम्ही समजलेच असाल. किशोरकुमार जो आधी स्वतः आणि नंतर देव आनंद साठी गात असे, पण त्याने 1969 ला “मेरे सपनो की राणी” असे गायले की स्वतः राजेश खन्नाच गात आहे असा भास होतो. मित्रांनो, मला सुध्दा हा आवाज किशोरदा चा आहे हे गाण्यातील थोडेफार समजायला लागल्यावर समजले. हे दोघे 1969 ते 1987 पर्यंत गात होते. तसेच आर डी बर्मन ने पण जवळ पास 40 चित्रपटाना संगीत दिले. ह्या दोघांचे खूप योगदान आहे.

राजेश खन्ना ने सर्वाधिक 8 सुपर हिट चित्रपट मुमताज बरोबर दिले. तसेच शर्मिला टागोर, आशा पारेख बरोबर पण त्याची यशस्वी जोडी जमली. 1974 चा मुमताज बरोबरचा “आप की कसम” हा तसा मोठा सुपरहिट चित्रपट. “आनंद” हा तर अवॉर्ड विंनिंग चित्रपट.
कॅन्सर पीडिताचे खूप छान काम त्याने केले. शेवटच्या प्रसंगात राजेश खन्ना मरतो त्यावेळी कितीतरी जणांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते. असा जिवंत अभिनय एक सुपरस्टारच करू शकतो.

1973 च्या नमकहराम या चित्रपटात फेरफार करून त्याने स्वतः ला मारून घेतले आणि तिथेच अमिताभ ला पुढे जाण्याची संधी भेटली आणि तो फसला.

पण मित्रांनो, अमिताभ ला राजेश खन्ना सारखे यश मिळू शकले नाही, असे अमिताभ स्वतः मान्य करतात.

सुपरस्टार एकच असतो. 1976 ते 1978 या दरम्यान त्याने 7 चित्रपट केले. पण ते चालले नाही. तसे 1977 मधील जॉय मुखर्जी दिग्दर्शित “छैलाबाबू” हा यशस्वी ठरला. त्यानंतर “अनुरोध”, “भोला भाला”, “कर्म” हिट झाले पण सरासरीच चालले. पण “थोडीसी बेवफाई” हा एक सुंदर चित्रपट आला.

लोकांना वाटत होते, राजेश खन्ना संपला. पण त्याच्या “सौतन” ने जबरदस्त पुनरागमन केले. त्यानंतर टीना मुनीम बरोबर त्याने अनेक यशस्वी चित्रपट केले. “अवतार”, “अमृत” हे या सुपरस्टार च्या सर्व अभिनय पैलूंचे दर्शन घडवतात.

“अवतार” पासून लोक आपली संपत्ती मुलाच्या नावावर करायला 10 वेळा विचार करायला लागले. ही त्याच्या अभिनयाची पावतीच होय. “नजराणा”, “आवाज”, “नया कदम” असे काही वेगळे चित्रपट त्याने दिले. तसेच “आखिर क्यू” त किशोरदा शिवाय या सुपरस्टार ने दोन गाणी, दुश्मन ना करे- एक अंधेरा छान जमवले. “राजपूत”, “धर्म और कानून” अशा मल्टि स्टार चित्रपटात पण तो कुठे कमी नाही पडला.

1985 ला “अलग अलग” हा चित्रपट निर्माण झाला. यातील सर्व गाणी हिट होती. 1990 चा “स्वर्ग” हा हिरो म्हणून त्याचा शेवटचा यशस्वी चित्रपट. त्यानंतर राजकारण करून त्याने परत काही चित्रपट केले. पण जे 1969 ते 1990 पर्यंत जे यश या सुपरस्टार ला मिळत गेले, ते नंतर कधी मिळाले नाही.
2008 ला “वफा” हा एकमेव चित्रपट कधी आला आणि गेला ते पण समजले नाही. पण त्यात त्याची अदा तीच होती पण सर्व बदलले होते.

पुढे तर हा सुपरस्टार एकांतवासात गेला आणि 28 जुलै 2012 रोजी सर्वाना सोडून गेला कधीही परत न येण्यासाठी. त्यामुळेच “जिंदगी के सफर मे गुजर जाते है, जो मकाम ओ फिर नही आते “…. लाखो लोक त्याच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. हेच त्याच्या लोकप्रियतेचे जाता जाता भेटलेले अवॉर्ड होते. हे भाग्य फार कमी लोकांना लाभते. तो खरोखर सुपरस्टार होता. तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले असा सुपरस्टार राजेश खन्ना जो पर्यंत फिल्म इंडस्ट्री आहे तो पर्यंत अमर राहील.💐

संदीप भुजबळ

– लेखन : संदिप भुजबळ. संगमनेर.
– संपादन : देवेंद भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सुपरस्टार राजेश खन्ना यांची सचित्र खूप सुंदर माहिती
    वाचताना जून्या जमानात घेवून गेली .खरोखर असा सुपरस्टार पुन्हा होने नाही .आजही त्यांची गाणी ऐकत राहवेसे वाटते .
    धन्यवाद।

  2. मित्रा संदीप खुप छान लेखन केलंस ,
    गायणाबरोबर लेखणाचाही छंद असाच जोपासत रहा.
    भावी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा. 💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments