“असरानी”
महान अभिनेता असरानी हे वयाच्या ८४ व्या वर्षी काल हे जग सोडून गेले. यानिमित्ताने त्यांच्या चाहत्याने वाहिलेली ही शब्दांजली. असरानी यांना विनम्र अभिवादन.
— संपादक.
कलाकार कधीच मरत नाहीत. आपल्या भूमिकांतून ते अजरामर होतात. पंचावन्न वर्षांची यशस्वी सिने कारकीर्द असलेले महान चरित्र अभिनेता असरानी काल इहलोक सोडून गेले. असरानी यांच्या असंख्य चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. आपल्या असंख्य सिनेमातून त्यांनी अमिट अशी छाप सोडली होती.
असरानी यांनी असंख्य सिनेमातून हलक्या फुलक्या, विनोदी व रंजक भूमिका सादर केलेल्या आहेत.
“साहब, श्रीवास्तव जी पी के आए है !”
“हाय राम, श्रीवास्तव जी कब से पिने लगे ?”
ही वाक्य तुम्हाला आठवत असतीलच !
हे “पी के श्रीवास्तव” म्हणजे दिवंगत असरानी यांनी वठवलेले “चुपके चुपके” या सिनेमातील विनोदी पात्र होते.
हलके फुलके कथानक, विनोदी पात्रे व शेवट आनंददायक असलेले सिनेमे मला भारी आवडतात.
“शोकांतिका” असलेले सिनेमे मी फारसे पाहात नाही. अपवाद
“आनंद” सारखे काही सिनेमे आहेत.

असरानी यांची असंख्य पात्रे मला आठवतात.१९८० मधे असरानी यांनी मुख्य हिरो बनण्यासाठी एक सिनेमा बनवला होता.
“चला मुरारी हिरो बनणे” हा सिनेमा मी आवर्जून पाहिला होता.सिनेमा फारसा चालला नाही. त्यानंतर असरानी यांनी हिरो चा नाद सोडून दिला.
पी के श्रीवास्तव- चुपके चुपके
मुरारी- चला मुरारी हिरो बनणे
नागेश शास्त्री- छोटी सी बात
अंग्रेजों के जमाने का जेलर- शोले
चंद्रु- अभिमान मधील सेक्रेटरी
विश्वनाथ- बावर्ची मधील नवखा संगीतकार
नारायण- परिचय मधील नोकर..
बीबी हो तो ऐसी मधील “बेरकी” सेक्रेटरी, अशा असंख्य भुमिकांनी असरानी यांनी रसिकांचे वेगळेच मनोरंजन केलेले आहे.

मेहमूद हे दिग्गज हास्य अभिनेता होते. त्यांच्या पाठोपाठ मला असरानी यांच्या भुमिका आवडतात. त्यांच्यावर चित्रीत एक गीत मला खुप आवडते.
“ना जाने दिन कैसे ..
जीवन मे आए है !”
चला मुरारी हिरो बनणे, या सिनेमातील हे गीत आहे.
तो सिनेमा फारसा चालला नाही.
हे गाणे खुप हीट झाले.
परंतु एवढे गंभीर गीत हास्य अभिनेता असरानी वर फीट बसले नाही.
आज असरानी जी आपल्यात नाहीत. परंतु ते “हिरो” बनून सदा सर्वकाळ आपल्या मनामधे घर करून राहतील!
दिवंगत अभिनेत्याला विनम्र अभिवादन.
— लेखन : डाॅ अच्युत बन. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
