Homeकलाचित्र सफर : 59

चित्र सफर : 59

“लतादीदी”

भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज; 6 फेब्रुवारी रोजी स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांना वाहिलेली ही आदरांजली. लतादीदींना विनम्र अभिवादन.
— संपादक

जनमानसावर गेली 8 दशके स्वर्गीय सुरांच्या मोहिनीचे गारुड कधी कमी झालेच नाही तर उत्तरोत्तर ते वाढतच आहे; आपल्या स्वरांनी रसिक श्रोत्यांना अभिषेक करत, चिंब भिजवत मंत्रमुग्ध करणाऱ्या, परमेश्वराचा कायम वरदहस्त लाभलेल्या गान सम्राज्ञी स्व.कु.लता मंगेशकर यांना तारखेनुसार आज स्मृतीदिन आहे.

जन्मोजन्मीचे संगीत उपजत घेऊन या जन्मी सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन सर्वांच्या हृदयस्थ मनावर स्वरांचा वर्षाव करून जनमाणसांचे जीवन लता दीदींनी सुसह्य केले .अगदी मनाच्या कोणत्याही स्थितीमधे त्यांची गाणी हृदयाच्या तारा झंकारत ठेवतात.

एकही गीतकार नाही की त्यांचे गाणे स्व.लता दीदीनी गायले नाही किंबहुना सर्वच गीतकार, संगीतकारांनी त्यांच्या जादुई, स्वर्गीय सुरांचा उचित उपयोग करून घेतला. लतादीदींनी प्रत्येक गीतास श्रवणीय करून रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. रसिकांच्या हृदयी विराजमान होऊन त्यांनी जागतिक विक्रमच केला आहे.

दीदी, आपण इहलोक सोडून परमात्म्यात विलीन होऊन स्वर्गस्थ झालात, पण आपला स्वर्गीय आनंद देणारा मधुर स्वर कानी पडत असताना असे जाणवतही नाही की आपण आमच्यात नाहीत, एव्हडे सुस्वरांचे गारुड आपण सर्वांवर करीत आला आहात. आपली स्वर बरसात, आम्हाला सातत्याने चिंब भिजवत आहे. शीतल प्रकाशात बसून सुरामृत आम्हाला प्रदान करत आहे, असेच मनाला भासत राहते, जगाच्या या सृष्टीच्या कानकोपऱ्यातून हळूच फुंकर घातल्यासारखा मंत्रमुग्ध आवाजाचे स्वर कानी पडतात “”मेरी आवाज ही पहेचान है”” अन् जीव कावराबावरा होऊन हृदयात कालवा कालव होऊन संवेदना गोठून, लोचनांचे बांध तुटून, अश्रू ओघळू लागतात, प्रत्येक रसिक श्रोत्याची हिच भावविभोर अवस्था होऊन, सजल नयन नित धार बरसती, अवस्था होऊन अश्रू अनावर होतात., प्रत्येक रसिक श्रोत्यांची हिच भावविभोर अवस्था होते !!

वात्सल्याने भारलेल्या ममत्वावर एन दैवी सुरावर् काळांने खऱ्या अर्थाने या स्वर मातेवर झेप घेऊन सर्वच क्षेत्रातील मान्यवर व अति सामान्य व्यक्तींना पोरके केलेले आहे. अगदी मन हेलावणारे वेदनादायक दुःख तरी कसे सहन करायचे ? निशब्द !!!!

आजन्म पुरेल इतके सुरांचे स्वर्गीय नक्षत्राचे अमूल्य देणे देणाऱ्या या स्वर सम्राज्ञी लता दीदींना सादर प्रणाम !!!

मीना घोडविंदे

— लेखन : सौ मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments