Saturday, February 14, 2026
Homeबातम्याचित्र सफर : 60

चित्र सफर : 60

सुरेखा गावंडे सन्मानित

कोहिनूर फिल्म फेस्टिवलमध्ये सुरेखा गावंडे यांना उत्कृष्ट महिला दिग्दर्शिका म्हणुन दिग्दर्शक दिनकर जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कोहिनूर फिल्म फेस्टिवल मुंबई 2025 डोंबिवली येथील देविशा हॉलमध्ये अतिशय आटोपशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

या फिल्म फेस्टिवल मध्ये स्पर्धेसाठी जवळपास 200 च्या वर शॉर्ट फिल्म आल्या होत्या. त्या फिल्म मधून जूरीनी 80 फिल्म निवडून त्यांना पुरस्कार प्रदान केले .

यावेळी व्यासपीठावर कोहिनूर फिल्म फेस्टिवलचे संचालक दिनकर जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते स्वप्नील वाकनकर, विनायक सपकाळे, परीक्षक, सुहास पाध्ये, सह दिग्दर्शक गणेश गुंजाळ उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून अनेक कलाकार, दिग्दर्शक उपस्थित होते.

अल्प परिचय :-
सुरेखा गावंडे यांचा मराठी गाण्याचा अल्बम तसेच नऊ पुस्तके प्रकाशित आहेत. सुगमभारती 2018 च्या पाठय पुस्तकात त्यांची कविता अभ्यासक्रमात होती. महाराष्ट्र तसेच देशाच्या राजधानीतही या कवयित्रीचा आणि तिच्या कवितांचा सन्मान झाला आहे.
पुढील वाटचालीस सुरेखा गावंडे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11