Monday, February 16, 2026
Homeसाहित्यचॅाकलेट, चॅाकलेट

चॅाकलेट, चॅाकलेट

होतं काय चॅाकलेट दिल्याने,
आजचा एक दिवस..?
येतील पोचवता सगळ्या भावना
जशाच्या तशा..?

सोपं असत असेल एव्हडं, खरच..,
हे प्रेम असं व्यक्त करणं..?

न बोलता व्यक्त होता येतच नसावं..?
का नाही.. ?
डोळे आहेत ना त्याच साठी,
स्पर्श आहेत..!!

मात्र डोळे दिसणारच नसतील तर..?
स्पर्शाची मुभाच नसेल तर..?

मग शब्द किंवा इतर माध्यमं..
गुलाब, चॅाकलेट, टेडीज् सारखी..!

नकळत व्यक्त होणारी..
अबोल भाव जोपासणारी..
मूक संवाद साधणारी..
तरल संवेदना जागवणारी..
प्रेमाची जाणीव प्रेमीला देणारी..
ती अवीट गोडी वाढवणारी..
आंतरीक जाणीवा उलगडणारी..
रेशमी गोड शिरशिरी आणणारी..
प्रेमाची अनुभूति जागवणारी…

आजचं चॅाकलेट याच साठी..

– रचना : डॉ मीना विनय
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11