स्मृतीहून भिन्न ज्ञान. ज्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा त्या वस्तुशी किंवा वृत्तिशी तद्रुप झालेले हेच स्थुलातील ज्ञान! पंचज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी अशा स्थूल इंद्रियाद्वारे येणाऱ्या संवेदना म्हणजे अनुभव.
परंतु इंद्रियांच्या पन्हाळीतून बाहेर पडलेले अंतःकरण जेव्हा त्या त्या विषयानुरूप बनते आणि अनुभव
पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये, मन बुद्धी किंवा इतर कोणत्याही
माध्यमाशिवाय येतात त्या अनुभूती !
माध्यमांच्या शिवाय जीवात्मा आणि शिवत्मा यांना येतात त्या अनुभूती !
परंतु कार्यकारिणी भाव चैतन्याशी एकरूप होईल तर ?
जी अनुभूती येईल ती चैतन्यानुभूती !
चैतन्य ब्रह्मतत्व असलेला जाज्वल्य, प्रदीप्त, अखंड ऊर्जेचा झरा. परंतु केवळ आणि केवळ अनुभूतीस पात्र, अव्यक्त असा !
चैतन्य अनुभूती एक आविष्कार आत्मरुपी चैतन्याला ब्रह्मचैतन्याचा किंवा बाह्य चैतन्याचा सहज स्पर्श.
आई बाळाला जन्म देते त्या बाळाच्या जावळाचा पहिला गंध, मनात फक्त एकच कृतकृत्य भाव मानव निर्मितीचे तेज असलेला अन् त्या तान्हुल्याप्रती एकच आर्जव.
बाळा होऊ कशी उतराई तुझ्या मूळे मी झाले आई ! तो चैतन्य क्षण बाकी नंतरच संपूर्ण आयुष्य जाणिवेच्या पातळीवर केलेलं प्रेम.
मागाहून येतात संस्कार अन् समाजभान ठेवून घडवणं.
चैतन्याचा क्षण तोच एकमेव.
माउलींच्या समाधीस्थळी ब्रह्मचैतन्याचा वास !
परंतु तो जाणवतो ? किती जणांना ?
आपण असंख्य विचारांची जळमटं घेऊन अन् मनात असंख्य वादळ घेऊन फिरत असतो, औपचारिकपणे माथा टेकवतो. आपल्या झोळ्या कायम दुबळ्या आणि फाटक्या. ती अनुभूती येण्यासाठी चैतन्याचं पाईक व्हावं लागतं तरच ती अनुभूती !
कृष्णसखा होईल ? का नाही ?
परंतु त्यासाठी मिरेच्या कृष्णतद्रुप चैतन्यावस्थे पर्यंत पोचावं लागेल !
तेच गीत, तेच सूर, तोच आवाज परंतू एखादं गाणं फक्त एखाद्या दिवशी मनावर स्वार होतं कारण आपण त्यावेळी त्या गाण्याच्या आत्म्यापर्यंत पोचलेले असतो.
नेमेची येतो पावसाळा पण मृद्गंध एकदाच भावतो कारण तेव्हा त्या सुगंधाने आपल्या जाणिवेची परिसीमा गाठलेली असते.
चैतन्यानुभूतीच्या उत्कट जाणीवेप्रत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात ! तरच अनुभूती.
केवळ स्थित्यंतरं ठाऊक असणाऱ्यांना चैतन्याची प्रत्यंतर कशी येतील ?
सर्द जाणिवा असणाऱ्यांना चैतन्याची अनुभूती येणं केवळ अशक्य !
अन् अद्वैताची अनुभूती तर केवळ शिवदशेतच !

– लेखन : सायली कस्तुरे. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अतिशय सुंदर! दिवसाची सुरुवात अशी छान वाचनाने व्हावी …खूप धन्यवाद
Nice
चैतन्यानुभूती हा एक विस्तृत विषय आहे.ती एक साधना आहे.
सायली कस्तुरे यांनी थोडक्यित पण नेमके सोप्पे करुन सांगण्याचा छान प्रयत्न केला आहे
धन्यवाद राधिका ताई.