Homeसाहित्यचैत्राची नवलाई……

चैत्राची नवलाई……

चैत्राची नवलाई दिसे अंगणी
नटूनी थटूनी हो साऱ्याजणी
सडा रांगोळी काढे दारी कुणी
पाऊल रुणझुण नाद पैंजणी
चैत्राची नवलाई दिसे अंगणी….

करू पूजन मखरे सजवा
सृष्टी सृजन मास ही नवा
वसंत आगमनी खेळे हवा
किलबिल करेल पक्षी थवा
चैत्राची नवलाई दिसे अंगणी…..

नैवेद्य दाख‌वाया खिरापत
आंबाडाळ घ्या कैरी सरबत
अंबे पूर्ण होऊ दे ग मनोरथ
आचरती सुहासिनी गौरी व्रत
चैत्राची नवलाई दिसे अंगणी….

श्रीखंड पुरी पोळीचा बेत
डौलात दिसावे ते रानी शेत
अक्षय धनधान्य देशी घरात
पाने फुले वेलीही हर्ष भरात
चैत्राची नवलाई दिसे अंगणी…..

माधवी ढवळे

— रचना : माधवी प्रसाद ढवळे. राजापूर; जि. रत्नागिरी
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments