एक असावा असा छंद
की मी पण त्यात हरवावे,
चाकोरीच्या जगण्यामधले
सोनेरी क्षण हे वेचावे
काळाचे ही भान नसावे
त्याच्या पुढती सारेच फिके,
मन गुंतावे त्यात असे
की जणू धुंदीचे दाट धुके
कुणाकुणाची फिकीर नसावी
स्वच्छंदी स्वैर लहरावे,
तहान भूक हरपून जाऊन
मनाचेच लाड पुरवावे
आल्हादित मनास करून
निखळ सुख हे भोगावे,
चाकोरीत पुन्हा येऊन
परत एकदा सटकावे.

– रचना : मेधा जोगदेव
खूपच छान काव्य रचना…
आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहीकडे…
या कवितेची आठवण करून दिली…