आपल्या देशातला निसर्ग हा केवळ विराटच नाही तर अदभूत आहे. पण हा निसर्ग टिपण्यासाठी कलात्मक दृष्टी आणि हातात एक अद्ययावत कॅमेरा असावा लागतो. छायाचित्रकारासाठी निसर्गाने भरभरून दान दिले आहे.
पशुपक्षी, लतावेली, नदीनाले, झरे सागर हे पर्यटनातील संजीवक घटक आहेत एकूणच छायाचित्रण ही कला मानवी जीवन समृद्ध करीत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी केले. ते माहूर येथील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाने. आयोजित केलेल्या “छायाचित्रण : एक संजीवक कला “या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोपी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य परिषद, शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी पत्रकार शंतनु डोईफोडे, जळगाव येथील छायाचित्रकार सुरेश सानप उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे सचिव ॲड विजयकुमार भोपी यांनी प्रास्ताविक केले.शिकारी लेखक राजे मधुकरराव देशमुख यांचे पुण्यस्मरण आणि जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून माहूर येथील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन केलेले होते.
श्री विजय होकणें पुढे म्हणाले एखादा परीस नकळतपणे हाती लागावा तसे एखादे छायाचित्र आपल्याही नकळतपणे आपण टिपतो.
मग असे नितांत सुंदर छायाचित्र एकाच वेळी नवनिर्मितीचे आणि कलेचे दर्शन घडविणारे ठरते. हा अनुभव मात्र शब्दातीत असतो.
आपल्या सेवेमुळे नांदेड च्या सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाला मिळणारी चालना चित्रबद्ध करता आली. नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ होट्टल, शंकतिर्थ, राहेर नृसिंह जुन्या व ऐतिहासिक स्थळाच्या छायाचित्राचे सादरीकरण केले. छायाचित्रकार हा एका अर्थाने जीवनाचा भाष्यकार, संशोधक आणि अध्यापकही असतो कारण वर्तमानाचे वास्तव तो जगासमोर मांडत असतो. तो नव्या विचारांच्या वाटाही रसिकांना दाखवत असतो असे सांगुन आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात विजय होकर्णे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रोजेक्टरच्या साह्याने आपल्या तासभराच्या व्याख्यानात होकर्णे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि कैलासस्पर्श, सुगरण पक्षी, शेकरू यांची माहिती, काही छायाचित्रे, ध्वनिफिती त्यांनी दाखवल्या. त्यांच्या कैलास स्पर्श या ध्वनिचित्रफितीला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सर्वोत्तम छायाचित्राच्या सादरीकरणातुन क्रिएटिव्हिटी आणि कला यांचे एकाच वेळी उत्तम दर्शन होकर्णे घडविले. आदर्श आणि परिपूर्ण छायाचित्र कसे असावे, ते कसे काढावे, त्यासाठी कसा विचार करावा, संधी कशी घ्यावी यासंबंधी ही माहिती देवुन, त्यांनी
छायाचित्रकारासमोरील आव्हाने, छायाचित्रकाराला येणाऱ्या अडचणी, करावा लागणारा सामना, संकटे आणि शेवटी छायाचित्रकाराला मिळणारे समाधान, छायाचित्रांचे मानवी जीवनातील स्थान स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा विश्वास जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास माहूर परिसरातील विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक मोठ्या उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
विजू होकर्णे चे भाषण आवडले, छायाचित्रांमध्ये मास्टरकी आहेच आता वक्तृत्व संपन्न झाले . शुभेच्छा