२१ मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस आहे. त्यानिमित्ताने वन संवर्धनाचे महत्व सांगणारी ही रचना…
– संपादक
हरित जंगल
स्त्रोत ऊर्जेचे
मानवास मिळे
देणे आनंदाचे……१
जंगल कुशीत
लपले वैभव
वनदेवतेचा
करूया गौरव……२
दूर जंगलात
प्राण्यांची ही वस्ती
एकोपा ठेवुनी
चाले त्यांची मस्ती……३
हिरवी जंगले
मोठे वरदान
प्राणवायू मिळे
मनी समाधान……४
जंगल सानिध्य
मनात चैतन्य
नुरे औदासिन्य
चित्त हे प्रसन्न……५
जंगल मंगल
आहेत संपत्ती
जंगलतोडीने
येईल आपत्ती…..६
वृक्ष रोपणाने
थांबे प्रदुषण
जंगलांचे आम्ही
करूया रक्षण……६
करूया जतन
जंगल संपदा
नाश जंगलांचा
येईल आपदा……७
— रचना : डॉ दक्षा पंडित. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख संदेश दिला आहे. पर्यावरण सुधारण्यासाठी आणि निसर्गाच्या संवर्धनाची विशेष काळजी व्यक्त झाली आहे. डॉ दक्षा, हार्दिक अभिनंदन 🎉🎉
सुंदर षडाक्षरी