Tuesday, July 1, 2025
Homeसाहित्यजगायचे राहून गेले…..

जगायचे राहून गेले…..

कर्तव्य आणि जबाबदारी
घेतली सर्व खबरदारी
आणि जगायचे राहून गेले…..

आज करू उद्या पाहू
दिवसांमागून दिवस सरले
आणि जगायचे राहून गेले….

सामाजिक बंधन, अटी तटी
नाही पार केल्या कधी चौकटी
आणि जगायचे राहून गेले….

नाते जपले सर्व सोसले
मनाचे कधी न ऐकले
आणि जगायचे राहून गेले…..

मोह माया प्रेमळ छाया
जगाच्या विचारात वेळ गेला वाया
आणि जगायचे राहून गेले….

अपेक्षांचे ओझे सदैव वाहिले
तडजोड करून नेहमीच पाहिले
आणि जगायचे राहून गेले….

स्वतःचे अस्तित्व कधी न जपले
जीवनभर सर्वांसाठी खपले
आणि जगायचे राहून गेले….

लोकांना ओळखण्यात चुकले
अनेक संधींना मुकले
आणि जगायचे राहून गेले….

न दिसला मनुष्याचा लबाडीपणा
सहन केला सर्वांचा खोटेपणा
आणि जगायचे राहून गेले……

लाख मर्यादा, सतत धाक
स्वप्नाची ती झाली राख
आणि जगायचे राहून गेले….
आणि जगायचे राहून गेले….

रश्मी हेडे

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. खूप छान रचना आहे ताई, मनाला भावणारी 👌👌👌

  2. खूपच सुंदर कविता … बऱ्याच लोकांना आपलीशी वाटेल अशी आहे ही कविता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील