Tuesday, June 17, 2025
Homeलेखजगू या आनंदाने !

जगू या आनंदाने !

एकदा का आपण रिटायर झालो की, शक्यतो आपल्या ऑफिस ग्रुपशी तसा काही संबंध रहात नाही. पण त्या सगळ्यांची आठवण येतच असते. ऑफिसची सुद्धा आठवण येते. काय छान होते ते सोनेरी दिवस, म्हणत आपण आठवणीत रमतो.

तर अशाच आम्ही एमटीएनएल मधून रिटायर्ड झालेल्या आम्हा मैत्रिणींचं दुसरं स्नेहमिलन नुकतंच खुप जल्लोषात पार पडलं.

ऑफिसच्या आठवणी जाग्या करत, गाणी, कविता वाचन, कराओके, फॅशन शो, डान्स मध्ये सहभाग घेऊन खुप उत्साहात, एकमेकात समरस होऊन हे स्नेहमिलन साजरे केले गेले. सर्व जणींच्या उत्साहाला अगदी उधाण आले होते.

ज्या वेळेस ‘रिटायरमेंट डे’ साजरा करायचा ठरलं त्या दिवसा पासून आपापल्या w’app ग्रुप वर मेसेज/कॉल करून सख्यांनी यायचे कबूल करून, कधी एकदा प्रत्यक्ष भेटतोय असे झाले होते. तसं सोशल मीडियामुळे आपण एकमेकांना भेटत असतोच पण प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद काही औरच असतो.

आमच्या स्नेहमिलन कार्यक्रमाला गणेशवंदनाने सुरवात झाली. नंतर गेल्या वर्षीच्या स्नेहमिलनाचा आढावा घेऊन, मनोगत, कविता वाचन, कराओके, ऑफिस च्या संपूर्ण कार्यकाळ च्या प्रवासावर आधारीत एक नाटिका सादर झाली.

फॅशन शो, डान्स, आणि रिटायर झाल्यावरही स्वतःची प्रगती करणाऱ्या महिलांचा सत्कार आणि हेही नसे थोडके म्हणत, वय वर्ष फक्त 62 पार केलेल्या, आमच्या सखीने, सौ सुरेखा गावंडे हिने सादर केलेल्या दोन लावण्यानी, झुमका शोधायला भाग पडणाऱ्या स्मिताने केलेला डान्स ने तर कार्यक्रमाची लज्जत वाढवली.

मनोगत, कविता सादर करताना, कराओकेवर गाणी गाताना, नेहमी शांत असणाऱ्या महिलांनी अतिशय उत्तम कविता आणि गाण्याचे सादरीकरण केले.

स्नेहमिलनवर आधारित आणि मनमोकळं जगा या विषयावर पूर्णिमा ची कविता, मानसी दागिना कसा असावा, तर सुप्रिया आणि स्मिता या सर्वांनी केलेल्या कविताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यामुळे त्यांचा धाडसीपणा आणि त्यांच्यात असलेले सुप्त गुण सर्वांना समजले.

ऑफिस मधील कार्यकाळ यावर आधारीत नाटिका सादर करताना प्रत्येक संवादाला हास्याची दाद मिळत होती. तर फॅशन शो साठी उपस्थित सर्व महिलांना सहभाग घेण्यास सांगितलं गेलं. सगळ्यांनी नटकत मुरडत ‘ये है जलवा’ या गाण्यावर मनसोक्त फॅशन शो एन्जॉय केला.

‘चंद्रा च्या लावणीवर, झुमका गिरा रे’ या गाण्यावर डान्स सादर करताना, शिट्या आणि टाळ्या वाजवून सर्वांनी मनमुराद दाद दिली. तर वर्षपूर्तीनिमित्त केक कापल्यावर सर्वाची पावलं गाण्यावर थिरकली.

सर्व सख्यानी मनसोक्त नाचून मनमुराद आनंद घेतला. हे पाहताना डोळ्याचे पारणे फिटले. केवळ या स्नेहमिलनामुळे सर्व पुन्हा एकदा एकत्र भेटलो याचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता.

रिटायर झाल्यावर स्वस्थ न बसता स्वतःची प्रगती केलेली आमची सखी सुरेखा, जिचे ४ कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत तसेच एक कविता शासनाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे.  मराठी पिक्चरसाठी गाणीही लिहिली आहेत आणि अनेक पारितोषिकांची मानकरी असलेली सखी सुरेखा, दुसरी सखी सौ वर्षा महेंद्र भाबल हिने तिचे आत्मकथन “जीवन प्रवास” पुस्तक रूपाने प्रसिध्द केले तर तिसरी मी स्वतः (सौ अलका भुजबळ) ‘न्यूज स्टोरी टुडे’ या वेबपोर्टलची निर्माती आणि  प्रकाशका ची नविन जवाबदारी स्वीकारली म्हणून अशा तिघींचा सत्कार आणि कौतुक करताना निवेदिका जयाचे शब्द अपुरे पडत होते.

ग्रुप ग्रुपचे फोटो मोबाईल कॅमेरे क्लिक करत होते. तर काहीजणी गळाभेटी मध्ये रंगून गेल्या होत्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन जया ने अतिशय रंगतदार, छान शब्दसंपदा वापरून केले.

सर्व सख्या जेवण झाल्यावर, पुन्हा पुन्हा लवकरच भेटू या, असं म्हणत होत्या. पण…. हॉल मधून कुणाचाच पाय निघत नव्हता.

या स्नेह मिलनाची आठवण म्हणून सर्वांना ट्रॉली बॅग गिफ्ट म्हणून देण्यात आली. ही बॅग घेऊनच आपण सगळे पिकनिक ला जाऊ या असे एकमेकींना आश्वासन देत सर्वांनी एकमेकींचा जड अंःतकरणाने निरोप घेतला.

हे सर्व स्नेह मिलन आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

अलका भुजबळ

– लेखन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

10 COMMENTS

  1. CONGRATULATIONS ALL NAVI MUMBAI MTNL BEAUTIFUL LADIES ON YOUR 3rd RETIREMENT YEAR RATHER 3rd YEAR OF YOUR 2nd INNINGS.
    Seriously speaking to have such a marvelous SENIOR YOUTH (NOT 60 BUT 16) like you all is just like blessing for our generation. All are so enthusiastic & energetic always. FULL OF LIVE, LOVE & LAUGH.
    MAY THIS JOURNEY REFRESH EVERY YEAR & STRENGTHEN YOU ALL.
    Heartfelt congratulations to Alka Maushi (Sau. Alka Devendra Bhujbal) – Prakashika & Aai (Sau. Varsha Mahendra Bhabal) – Lekhika for your Book Publication – Jeevan Pravas…Many more to come..
    Wish you all the best & have a successful year ahead.

  2. स्नेहसंमेलनातून सहभागाचा उत्साह ओसंडून वहात होता.असे उपक्रम जगण्याला बळ देतात.वृत्तांकनही छान.

  3. स्वेच्छा निवृतीच्या द्वितीय स्नेहमीलन ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व सख्या एकत्र येऊन सुंदर आयोजन केले. कविता, चारोळी, गाणी, डान्स, फॅशन शो सारखे कार्यक्रम करून स्नेहमीलन साजरे करून सर्वांनी निर्भेळ आनंद लुटून स्नेहमीलन “जगू या आनंदाने” शीर्षक
    नाव सार्थ केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन 🌹 असे अनेक स्नेहमीलन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपणा सर्वांना दीर्घायुष्य लाभो अशा मंगलमय शुभेच्छा 🌹
    🙏धन्यवाद

    • धन्यवाद आरोटे अश्याच शुभेच्छा हेच आमच्या कार्यक्रमाचे यश

  4. अप्रतिम, अविस्मरणीय असा मस्त स्नेहमिलन MTNL चा कार्यक्रम अलका,तू तूझ्या सुदंर प्रतिभेला साजेसा असा छानच लिहिला आहेस. प्रत्येकीने केलेली आपापली कला छान मांडली आहे. विशेष कार्य करणाऱ्या कलाकाराचे तू आदरपूर्वक सन्मान करते हा विशेष गुण आहे. खरं तर अनेक गुणांनी तू परिपूर्ण आहेस. हा पूर्ण कार्यक्रम तुझ्या शिवाय होणे अशक्य आहे.
    अलका, तु बहुगुणी आहेस, सर्वाना मिळून मिसळून, प्रत्येकीच्या कलेला वाव देत तिला प्रोत्साहित करते.
    अनेकांना तू लिहित केलं, अनेकांना गायक केलं.
    अनेकांची नृत्य कला बाहेर काढलीस. सगळ्याजणी मस्त, मनमोकळ्या झाल्या एक एनर्जी, एक टाॅनिक घेऊन
    सगळ्याजणी आनंद साजरा करत होत्या तू हे सर्व अचूक शब्दात मांडले आहे. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
    तू असाच आनंद देत जा असाच आनंद घेत जा.
    अनेक शुभेच्छां आणि अनेक उपक्रमासाठी सदिच्छा.

    • वाह पौर्णिमा तुझ्या कवितेने ने सर्वाना मनमोकळं होण्याची संदेश दिला आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल स्नेहमिलन जल्लोषात पार पडलं.
      तुझ्या कौतुकाने माझा उत्साह अजून वाढला. खुप खुप धन्यवाद पूर्णिमा.

  5. खुप छान सुंदर अगदी सेन्हमिलन जसं चे तसं डोळ्यासमोर आले.सगळ्या नात्यानं पेक्षा मैत्री चे नाते खुप च सुंदर व श्रेष्ठ असते.त्यामुळे असे उपक्रम सगळ्या मैत्रिणींनी नक्की करावे.. खुप छान अलका ताई व मैत्री टिम 💃💃💃💃😍😍😍😍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?