Cause of suffering is lack of love ! ❤️ आयुष्य खुप छोटे आणि सुंदर आहे परंतु आपण तसे ठेवण्याचा अथवा राहण्याचा प्रयत्नच करत नाही. जन्म घेतो तो फेडण्यासाठीच असतो. अनंत अडचणींना सामना करत करत जगत असतो, अपमान, अपयश, मानसिक, शारीरिक ताण, आर्थिक अडचणी अशा एक ना अनेक समस्या घेऊन जगत असतो.
ह्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होतो. घरात भांडणे, कलह, सतत अस्थिरता त्यामुळे प्रचंड दुषित लहरी तयार होतात घरात. पैसा हा मनुष्याच्या वेदनेचे मूळ कारण आहे. आयुष्य जगता आलेच पाहिजे. आपण ढकलत असतो. ह्याचा परिणाम मानसिक आणि शारिरीक असमतोलात होते.
आपण काय सुधारू शकतो ह्यातून, तर एक सांगू, आपले नैराश्य घरातल्यांवर काढण्यापेक्षा एकमेकांवर प्रेम करण्यास सुरूवात करा. मुक्त जगा, दुसरऱ्यांनाही मुक्त जगू द्या. गतजन्मातील ऋण फेडण्यासाठीच तर जन्म घेतलेला असतो. जर काही वेदना असतील तर मुक्त व्हा. असे न केल्याने आपण आपलेच नुकसान करतो.
आपण जसे प्रेमाने वागण्यास सुरूवात करतो तसे आपल्यातील दैविक आत्म्याची जागृती होते. नका काढू दोष सतत. फक्त प्रेम करा सगळ्यांवर. देवावर नक्की विश्वास ठेवा. तो फक्त प्रेमानीच अनुभवता येतो. मोगऱ्याचा वास दरवळू लागेल. प्रेमानीच परिस्थितीला तोंड देता येते. हे जीवन सुंदर आहे. भरभरून जगा. नाही तर cause of suffering is lack of ❤️ love !

– लेखन : शलाका कुळकर्णी. नेदरलॅंड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹जगू या प्रेमाने 🌹
जगण्याची सुंदर परिभाषा आपण मांडली.
धन्यवाद
अशोक साबळे
Ex Indian Navy
महाड