रायगड जिल्ह्यातील अनेक वाड्यातील ७५ जनजाती वरवधुंचे सामुदायिक विवाह वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फॉउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील वाशिवली येथे नुकतेच संपन्न झाले.
श्री व सौ.वैशाली अक्षय शिमग्या शिंगवा आणि श्री व सौ.गीता दशरथ अरुण वाघमारे या जोडप्यानी सामुदायिक विवाहात सहभागी झाल्यामुळे आपल्या लाख ते दीड लाख रु ची बचत झाली असे सांगितले आणि आपल्या गावासाठी नवीन पायंडा रचला.
या प्रसंगी सर्व दाम्पत्यास संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. तसेच तेथेच विवाह मंडपात सर्व नूतन दाम्पत्यांस विवाह प्रमाणपत्रे देण्यात आली.
वनवासी कल्याण आश्रम, कोकण प्रांत अध्यक्षा राज्य शासन पुरस्कारप्राप्त ठामताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सामुदायिक सोहळ्यास केप्री फौंडेशनचे राजेश शर्मा, बेणीप्रसाद राऊका, नीता जोशी, राहुल रसाळ उपस्थित होते.
केप्री फॉउंडेशनच्या नीता जोशी यांनी वनवासी कल्याण आश्रमाने आयोजित केलेल्या या जनजाती समाजाच्या सामुदायिक सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन योग्य ठिकाणी, योग्य मदत जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
वनवासी कल्याण आश्रमाचे सचिव, रवींद्र पाटील,
कोषाध्यक्ष मोहन मुझुमदार, वेणूताई, ईश्वर कातकरी, सुचिताताई जोशी यांनी छान नियोजन केले.
उरण तालुक्यातून अध्यक्ष मनोज ठाकूर, उपाध्यक्ष अजित भिंडे, सचिव विश्वनाथ कातकरी, सहसचिव कुणाल सिसोदिया, सुनंदा कातकरी, रमेश फोफेरकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्या मीरा ताई पाटील, वामन म्हात्रे, श्रीनाती बेबीताई कातकरी, कमलेश वर्मा, कु. आकाश शहा यांनी विशेष मेहनत घेतली.

– लेखन : विठ्ठल ममताबादे
– संपादन :देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
मनापासून अभिनंदन..!
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007 / 9850573747