Home साहित्य जन्मदाता

जन्मदाता

1

बाबा माझा आदर्शच
मन त्याचे मोठे फार ।
जसा काटेरी फणस
आत त्याच्या गरे गार ।।१।।

जन्मदाता माझा भला
संघर्षाची त्याची वाट ।
खूप संकटे झेलली
नागमोडी होता घाट।।२।।

नाही केला त्याने मोह
रात्र दिवस राबला
सारे आयुष्य खर्चले
नाही कधीच थांबला ।।३।।

पोरं माझी शिकावित
होती इच्छा त्याची फार
साधे कपडे घालूनी
सांभाळले घरदार ।।४।।

ज्येष्ठ सर्व गावातला
मान त्याचा होता बरा
कधी नाही घाबरला
न्याय दिला त्याने खरा ।।५।।

स्वाभिमानी जगण्याचा
वसा त्याने दिला मला ।
जन्म अपुरा पडेल
ऋण त्याचे मोजायला ।।६ ।।

अरुण पुराणिक

– रचना : अरुण त्रिंबक पुराणिक

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version