राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्ताने विशेष कविता
सुरक्षा सप्ताहात
करू जन प्रबोधन
तोच खरा विकास
जो फुलवतो पर्यावरण
गाडी चालवताना
खेळू नका जीवाशी
हेल्मेटकडे दुर्लक्ष
येईल तुमच्या अंगाशी
गाडी चालवताना
बोलू नका मोबाईलवर
दारू पिऊन ड्रायव्हिंग
बेतेल तुमच्या जीवावर
सर्वांनीच पाळू
नियम रहदारीचे
सडक सुरक्षा मोलाची
रक्षण करते जीविताचे
अबाधित ठेवू सुरक्षा
औद्योगिक क्षेत्रातली
क्षेत्र कोणतेही असो
पाळू आपण नियमावली
प्रत्येक नियम आहे
आपल्याच भल्यासाठी
हेल्मेट न वापरणं, नियम मोडणं
चूक आहे ती सर्वात मोठी
विद्युत सुरक्षा, अग्निशामक यंत्रणा
जाणून घेऊ प्रथमोपचार
वेळीच जे होतात
तेच खरे उपचार
आपत्ती व्यवस्थापन
गरज आहे काळाची
शिकून घेऊ काळजी स्वतःची
घेऊ काळजी समाजाची
कार मधला सिट बेल्ट
आहे आधुनिक कवच कुंडलं
नियम पाळा, स्वच्छता ठेवा
यात तुमचंच आहे भलं
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/10/IMG_20211015_194240-150x150.jpg)
– राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई.