मार्तंड मल्हारी
जेजुरीच्या गडावरी
एका बाजूला म्हाळसा
दुसऱ्या बाजूला बाणांई
मधे शोभतो राजा मल्हारी
लिबंलोण उतरा ग बाई.
यळकोट यळकोट जय मल्हारी
भक्त करीती जयघोष
जेजुरी च्या गडावरी
गळ्यात कवडीमाळा
हळदीचा भंडारा झाला
भंडारा उधळला
देव झाला सोन्याहून पिवळा
दिवट्या पाजळून खोबरं भंडरा उधळला
देव माझा दिसतो कसा सुंदर
वाघ्या मुरळी नाचती देवाचा जागर करिती
संबळाचा नाद घुमतो
शिव शंभूचाच अवतार
दिनाचा करितो उध्दार
जय मल्हार जय मल्हार
नित्य असतो जेजुरी च्या गडावर!!
गडाची वाट अवघड भारी
भक्त करिती वारी
खंडोबाचा रविवार
चंपाषष्ठी असतो जन्मोत्सव
करा गजर यळकोट यळकोट जय मल्हार
पौष महिना पौर्णिमेला
देव गेले गुपचूप पालीला
केले बाणाबाईशी स्वयंवर
म्हाळसा रूसली
समजूत पटवली
बसले घेऊन उजव्या बाजूला
बाणू डाव्या हाताला
दोन्ही राणी घेऊन सोबतीला
बसले राजा मल्हारी सिंहासनावर
झाला जय जयकार
जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार

– रचना : सुरेखा तिवाटणे