Monday, July 14, 2025
Homeसाहित्यजय संविधान

जय संविधान

डॉ. बाबासाहेबांचे योगदान
सर्वांच्या कर्तव्याचे भान
सर्वांना संधी समान
अर्थात आपल्या भारताचे संविधान || १ ||

सर्व कामगारांची जान
सर्वांना हक्क समान
देशातल्या स्त्रीयांचा सन्मान
अर्थात आपल्या भारताचे संविधान || २ ||

दंडाधिकाऱ्यांचा पान
ना कोणाचा अपमान
प्रत्येक नागरिकाला मतदान
अर्थात आपल्या भारताचे संविधान || ३ ||

आपल्या भारताची शान
आपल्या लोकशाहीला मान
प्रत्येकाला स्वत:चा अभिमान
अर्थात आपल्या भारताचे संविधान || ४ ||

सं= कल्प आधुनिक भारत बलवंत करण्यासाठी
वि= विध जातीला एकत्र आणण्यासाठी
धा= र्मिक समानता राबविण्यासाठी
न= गण्य विचारांना हि प्राधान्य मिळण्यासाठी !!५!!

विलास देवळेकर

– रचना : विलास देवळेकर. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments