नाशिक येथील इच्छापूर्ती महिला मंडळ लाडशाखीय वाणी समाज यांच्यातर्फे ‘जागर कोजागिरीचा‘ कार्यक्रम 30 ऑक्टोबर रोजी देशपांडे हॉलमध्ये हाउसफुल गर्दीत संपन्न झाला.
या कार्यक्रमात लहान मुलींनी आणि महिलांनी गणेश वंदना, देवी भक्ती गीते, भोंडल्याची (भुलाबाईची) गाणी, नृत्य, भारुड, प्रबोधनात्मक भारुड, एकपात्री प्रयोग तसेच महिलांचे अत्यंत बहारदार नृत्य असे अनेक विविध कलाविष्कार सादर झाले.
प्रारंभी दीपप्रज्वलन मंडळाच्या अध्यक्षा सौ विद्या सामनेरकर, माजी अध्यक्षा सौ अलका अमृतकार, सौ वैशाली मेतकर, सौ कल्पना येवले आणि नवहितगुज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ चित्रा कोठावदे यांनी केले.
विद्या सामनेरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा सादर केला.
अशा कार्यक्रमादरम्यान सर्व सखींना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळते. महिनाभर सर्व सखींनी मेहनत घेतली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुजाता येवले यांनी अत्यंत प्रभावीरीत्या केले.
माजी अध्यक्षा सौ अलका अमृतकर यांनी कोजागिरी पौर्णिमेची काव्यमय माहिती सांगितली तर सौ मनीषा सामनेरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
सहभागी सखी कलाकारांना आणि बालिकांना आकर्षक बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी नवहित गुज महिला मंडळाच्या खजिनदार सौ. प्रणाली बागड आणि सौ. रेखा कोतकर यांचीही उपस्थिती होती. अत्यंत चविष्ट सुरुची भोजन आणि मसाला दूध आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800