Saturday, February 21, 2026
Homeसाहित्यजाणता राजा…

जाणता राजा…

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या प्रत्येक शब्दातील आद्याक्षर घेऊन कवयित्री विजया केळकर यांनी तयार केलेले काव्य पुढे देत आहे. विशेष म्हणजे महाराजांचे पेन्सिल चित्र सुद्धा केळकर मॅडम यांनीच रेखाटले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
— संपादक

*श्री*–श्रीमान योगी जन्मला
*शिव* नेरी
**- छटा आसमंती नवी सोनेरी
*त्र*–त्रस्त जनतेतून जमवविला संघ ‘मावळा’
**–परस्त्रीस आई-भगिनीचा मान मिळाला
*ती*–तीन शाहीवतीन परकियांना पाणी पाजिले
*शि*–शिवभक्तानं हिंदवी राज्य हे स्थापिलेव
*वा*–वापरून गनिमीकावा. विजयी झाले
*जी*–जिवाभावाचे सोबती हरदम तत्पर होते
**–मर्द मराठा कठोर नियमा ठाम होते
*हा*–हासत निडरपणे भकास पुणे केले समृद्ध
*रा*–‘राज्य व्यवहारकोश’द्वारे मराठीस
**–जनतेसी केले आपलेसे, स्वत्व राखले

ऐका होsजी जी जीss ऐसा ‘जाणता राजा’ झाला.

— रचना : विजया केळकर. हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments