धकाधकीच्या जीवनातील विसावा
मित्र व मैत्रिणीचा ठेवा
मित्र व मैत्रिणीचे समीकरण
पृथ्वीवरील एक अजब रसायन
मित्र असतो कणखर, ती मात्र हळवी
अशी ही त्यांची जोडसाखळी
ती असते बोलकी, तो असतो अबोल
जपतात हा मैत्रीचा तोल
दोघांची ही जोडीच भारी
नसते कोणती दुनियादारी
हक्काचा हा मैत्रीचा कप्पा
जेथे रंगतात मनसोक्त गप्पा
अपेक्षांचे ओझे नसते
अतूट, निर्मळ नाते जपते
नात्यात न कोणत्या अटी – तटी
परमेश्वराने निर्माण केलेल्या भेटी
नसती कोणती लपवा छपवी
समजून घेण्याची असते खात्री
भावनांना मिळते मोकळी वाट
असते एकामेकांना भक्कम साथ
या नात्याला न कोणते नाव
मनाच्या गाभाऱ्यात वसते हे गाव
अद्भुत अदृश्य हा बंध
सदैव दरवळत राहो हा सुगंध.
रचना : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.