माझिया जीवनाचे कोडे
मी स्वतःच सोडवावे
एकट्या वाटचालीत माझ्या
मी कधी न थकावे ॥ १ ॥
आयुष्यातील प्रश्नांनी
मी धडे गिरवावे
उत्तरे शोधतांना
मन कधी न कोलमडावे ॥ २ ॥
स्पंदने हृदयाची मोजताना
कधी बेरीज न चुकावी
झाल्या चुका निस्तरतांना
वजाबाकी न विसरावी ॥ 3 ॥
निर्भेळ आनंद भोगतांना
सुख मी गुणत वाटावे
दुःखालाही पंगतीत
मी मानाने बसवावे ॥ ४ ॥
माझियासाठी जगाचे
स्थान मौल्यवान
माणुसकी वाचुन माझे
जगणे अर्थहीन ॥ ५ ॥
सोशीन मी दुःख जे जे
माझे एकटीचे असावे
सुखात माझ्या अवघे
जग वाटेकरी असावे ॥ ६ ॥
स्वप्नाळू लोचनांनी
मी जगत् कल्याण पहावे
सत्यासाठी मी हसावे
खोट्या विरुद्ध मी भांडावे ॥ ७ ॥
आशयघन शब्दांनी
हृदयीचा भाव व्यक्त व्हावा
माझिया मनीचा उमाळा
शब्द माधुर्यात सजावा ॥ ८ ॥
पुजिले सद्विचार हृदयात
आचरणात यावे
माझिया जिव्हेच्या बोलांनी
आसमंत तृप्त व्हावे ॥ ९ ॥
दिलास जन्म तु मला
व्यर्थ नको पांडुरंगा
क्रियेविण वाचाळता
वागणे व्यर्थ सांगा ॥ १० ॥

– रचना : सुजाता येवले
सुंदर 👌👌👍
Very nice.
This is one of the best. Keep writing
उत्कृष्ट रचना सुंदर अभिव्यक्ती
अप्रतिम👌🏼💥
अतिशय समर्पक भावना .
सुंदर 👍
अप्रतिम कविता
जीवनाचे कोडे अतिशय सुंदर रित्या उलगडले आहे. अप्रतिम 👌👌
खुप छान
Khup Sundar Kavita 👏👏💐💐
Khup chan Sujata👌
खूप छान 👌👍
सुंदर कविता