कशामुळे आहे सांगा आयुष्याला गती ?
कशामुळे माणूस करतो, सतत प्रगती ?
कधी कळेल, नक्की कुणा, समाधान काय ?
थोडे थांबा,आनंदाचा शोध, हा उपाय,
कधी स्मरेल देवा तुला, गतिमान जग ?
रोज नव्या समस्यांचा, जन्मतो संसर्ग,
बाहेरून शान सारी, आत जीव रीता ?
कळेल कधी, समरांगणी का सांगितली गीता?
जय पराजय नित्य युद्ध असेच रे चाले,
माणूस झाला आहे, त्याचा लोभाचे बाहुले,
किती ताण, दडपण, मन ना मोकळे,
कसे जगती हे जीव, प्रारब्ध रोकडे ?
कळू दे रे देवा यांना, मोल हसण्याचे,
कळू दे रे सुख, दुखः, कुणा जपण्याचे,
आधाराचे बोल देती, कशी रे उभारी,
जगणे कळु दे, उंच मारता भरारी…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800