ध्येय दिशा नेमकी असू दे,
मग चालत वा धावत जाऊ,
सोबतीस असतील ते येतील,
कधी एकटे किल्ला लढू,
कसेतरी हो जगण्यासाठी,
निश्चित माझा जन्म नसे,
करून जाईन काही ज्यावर,
केवळ माझे नाव असे,
काही छोटे, काही उत्तुंग,
कार्य ते होईल लोकांसाठी,
पाप पुण्य ते किती साठले,
मी नाही केली गणती,
काही थोडे लोक जोडले,
मित्र, सवंगडी, साधक काही,
रक्ताची नाती, कर्तव्य स्मृती,
प्रेमाची नाती, जीव झोकुन देई,
आज प्रवासाच्या वळणावर,
शांतपणे आठवणी येती,
लढत राहिलो प्राणपणाने,
मनात, समाधान, शांती…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800