Friday, November 22, 2024
Homeलेखजीवन म्हणजे काय ? : ७

जीवन म्हणजे काय ? : ७

जीवन म्हणजे काय ? या विषयी आणखी काही लेखन प्राप्त झाले आहे. काही भाग आज पासून पुन्हा प्रसिद्ध करीत आहे.
– संपादक

जीवन गाणे”

“जीवन” हे देवाने आपल्याला दिलेले सगळ्यात सुंदर वरदान आहे. ज्याप्रमाणे “व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात, “तसेच प्रत्येकाचे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या असतो.
माझ्या मताप्रमाणे जीवन एक “रोलर कोस्टर” आहे. त्यात उतार चढाव, सुख दुःखाचा ऊन सावलीप्रमाणे लपंडाव चालूच असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या “रोलर कोस्टर” वर स्वार होऊन आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यातले उतार चढावही वेगवेगळे असतात. आपल्याला उद्या आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे, याची माहिती नसते. आजचा मिळालेला प्रत्येक क्षण आनंदाने जगा. म्हणूनच किशोरदा म्हणतात, “जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना “..

“समाधान “हे सुखी जीवनाचे मूलमंत्र आहे. पण समाधानाच्या परिभाषा या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. नेहमीच माणूस आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसे प्रयत्न केलेही पाहिजे. पण यश मिळाले नाही तर ना उमेद न होता आपण प्रयत्न केले यात समाधानी राहावे. “अल्प समाधानी” आणि “समाधानी” यात अत्यंत बारीक रेष आहे. ज्याला ही रेष उमगली त्याला जीवनाच गणित कळलं असं म्हणणं वावग ठरणार नाही.
म्हणूनच किशोरदानी कदाचित म्हटलं असेल, “जिंदगी का सफर है ये कैसा सफर कोई समझा नही कोई जाना नही.”
कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. जीवनात सुखदुःख, यश अपयशही चालूच असतात. पण गोष्टींनी खचून न जाता जगण्याची कला अवगत केली पाहिजे. “जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है” या सुंदर गाण्यात किशोरदांनी आपल्याला जगण्याची कला शिकवली आहे.

सुखी जीवन जगण्याची कला आपल्याला कुठल्याही शाळेत शिकवली जात नाही. ती आपलीच आपल्याला अवगत करावी लागते. जीवन हीच एक शाळा आहे. जीवनात येणारे अनुभव म्हणजे आपले धडे आणि आपल्या आजूबाजूचे लोक म्हणजे आपले शिक्षक. यातून जे काही आपण शिकतो, जे काही अनुभव घेतो ते कुठल्याही पाठक पुस्तकात शिकवले जात नाही.
म्हणूनच शेवटी उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी म्हटलेलं गाण्यातून जीवनाचा अर्थ सांगावासा वाटतो “जीवनगाणे गातच राहावे, जीवनगाणे, झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे !!!

— लेखन : सौ.आश्लेषा गान. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. जीवनाचे महत्व खुप छान सांगीतलय, पुढचा लेख कधी येईल याची वाट पहातोय 👌👌

  2. अगदी खरंय..समाधानी असलं की आयुष्य सुंदर आणि आणि आनंदी असते.. म्हणजे mhanje आपण हा “सफर” आनंदाने करू शकतो..आणि suffer होत नाही. खूप छान आश्लेषा.. तुझं लिखाण वाचायला छान वाटतंय.. आणि एक वाचून झालं की पुढचा लेख कधी येईल याची वाट पहात असते..खूप खूप शुभेच्छा तुला 👌👌

  3. जीवनाचे सार सुंदर आणि समर्पक भाषेत सांगणारा खूप छान लेख आहे. लेखिका आश्लेषा गान ह्यांचे अभिनंदन 💐

  4. 👌👌👌👌👌वा खूप छान,साध्या सोप्या भाषेत जिवनाचे महत्व खूप छान सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments