Thursday, December 26, 2024
Homeलेख"जीवन म्हणजे काय ?" : ८

“जीवन म्हणजे काय ?” : ८

जीवन म्हणजे काय ?

हा प्रश्न वरकरणी सोपा जरी वाटला तरी विचार करायला लावणारा आहे. देवाने निर्माण केलेल्या जन्म आणि मृत्यू मधील रिकामी जागा म्हणजे जीवन. ती रिकामी जागा कशी भरायची ? हे आपल्या हातात असते.

जीवन जगायला काय लागतं अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत बाबींव्यतिरिक्त आपली मानसिकता आपल्याला जीवन कसे जगायचे हे सांगते.

आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक गुरुदेव श्री. श्री. रविशंकर म्हणतात, “जीवन ही जगण्याची कला आहे. वर्तमान जगायला शिका.” वर्तमानात जगताना भविष्यात काय होणार ? भूतकाळात असे का झाले ? याचा विचार करताना आपण वर्तमान जगायचे विसरून जातो. जीवन जगायला काय लागतं तर सुख- दुःख, समाधान, आनंद, संघर्ष. हे जीवन जगण्याचे टॉनिक आहे.

जीवन म्हणजे सुखी आयुष्य असे म्हटले तर, सुख- दु:ख हे आपल्या मानन्यावर आहे. उदाहरण द्यायचे असेल तर, एका श्रीमंत मुलाची बॅग, कपडे, पुस्तक एखाद्या गरीब मुलाला मिळाले की त्याच्या सुखाला, आनंदाला परिसीमा नसते. जे आहे, जे मिळते त्यात तो सुख मानतो. पण त्या श्रीमंत मुलाला दुकानात तासभर बॅग निवडल्या नंतरही मनासारखी बॅग मिळत नसेल तर तो दुःखी होतो. दोघांचीही जीवन जगण्याची कला वेगळी आहे.

ग .दि. माडगूळकर म्हणतात, “एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे. जरतारी वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे”. आपल्या जीवनात सुख कमी असले, दुःख जास्त असले तरी आयुष्य जगायला या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. दुःखाला जर आव्हान म्हणून स्वीकारलं तर ते दुःख, दुःख राहत नाही. गरीब माणूस पैसा नाही म्हणून दुखी होतो. खूप मेहनत करतो पण रात्री सुखाने झोपतो. पण श्रीमंत माणसाला खूप पैसा असूनही सुखाची झोप येत नाही म्हणून दुःखी होतो. एकच वस्तू दोघांच्याही जगण्याला विरोधाभास दाखवतात.

आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानले तर हे जीवन सुखमय होते. पण दुसऱ्याजवळ जे आहे ते माझ्याजवळ का नाही ? याचा विचार करत बसलो तर ते आयुष्य, ते जीवन दुःखमय होते. आपल्या जीवनात अपेक्षांची यादी फार मोठी असते. माझ्या मते अपेक्षा आणि इच्छा यामध्ये फरक आहे. इच्छेसाठी आपण स्वतः मेहनत करतो. अपेक्षा ही नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण नेहमीच असमाधानी राहतो.म्हणून “समाधानाची शिदोरी” नेहमी आपल्याजवळ ठेवावी.

आता आपण म्हणतो, आहे त्यात सुख माना, आहे त्यात समाधान माना. पण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसाला मेहनत करावीच लागणार आणि जिथे मेहनत आली तिथे संघर्ष येतोच. स्वतःसाठी, कुटुंबासाठी आपण मेहनत तर घेतोच पण या व्यतिरिक्त प्रगती करताना येणाऱ्या अडथळ्यांशी संघर्ष, शारीरिक, मानसिक, नैसर्गिक तसेच नातेसंबंधात येणाऱ्या अनेक अडथळ्यांशी संघर्ष करावाच लागतो.तिथे मात्र ‘समाधानी वृत्ती’ चालत नाही. हे सर्व ज्यांना सांभाळता आले, त्यांनाच जीवन कळले हो !’

शेवटी काय ज्यांना दुःखासोबत सुखाची घडी मांडता येते, दुसऱ्यांना आनंद देता देता स्वतःही आनंद उपभोगता येतो, समाधानी वृत्ती ठेवता येते, आणि जीवन जगताना येणाऱ्या अडचणींशी संघर्ष करता येतो, त्याला जीवन जगण्याची कला कळली असे मला तरी वाटते.

— लेखन : सौ.शितल अहेर. खोपोली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. जीवन म्हणजे तुझ्या पासून माझे हृदय , एका हाकेच्या अंतरावर,
    सांगू नकोस कुणा मी तुझ्या बंधनात आहे,
    शून्य मी शुण्यातले माझे अस्तित्व इथले,
    जीवनाचे
    मोल माझे इतकेच मी तुझ्या स्पंदनात आहे.

  2. संघर्ष हा सदवर्तन कडे जाण्याचा उत्तम मार्ग असतो. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष नाही त्यांचे जीवन अळणी असते.वाचनीय लेख.

    गोविंद पाटील सर जळगाव

  3. जीवन म्हणजे काय? हे या लेखा अत्यंत मार्मिक भाषेत उदहारणसह उत्तम प्रकारे समजावून सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९