कवयत्री नेहा हजारे यांची भाची, सौ प्रितु हिस मुलगा व मुलगी असे जुळे झाले. या आनंदाने हरखून जाऊन त्यांना सुचलेली ही छान कविता…..
हरखून गेले मन
शहारली तिची काया
उमगले जेव्हा तिला
कोंब धरिला मातीला
धरा तिला ठेंगु भासे
बालकांची छबी दिसे
कळताच तिला बाई
आहे द्वय जोडी पोटी
कोड कौतुक हो भारी
तिच्या सासरी माहेरी
पती लाडं लाडं करी
माय डोहाळे पुरवी
ज्ञात अज्ञात छकुले
लिंग तया न उकले
बाळं देवाची ती देन
काही होवो ठेऊ मान
सोनी सोन्याचे स्वागत
पुर्ण झाले मनोरथ
देवदूत भासे द्वय
द्रौपदीती कृष्णमय
– रचना – नेहा हजारे. ठाणे
जीवनातील आनंदाला सुरेख शब्दांत गुंफले आहे.अभिनंदन
🌹खूपच छान कविता 🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ