Home बातम्या ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले

ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले

1

ज्येष्ठांना छळवाद विषयक कायद्याची माहिती नसल्यामुळे वारंवार विविध घटना घडत आहेत. या करिता जेष्ठांनी जागृत राहुन जेष्ठ नागरिक छळवाद विषयक कायदा समजुन घेऊन सावध राहायला हवे, असे आवाहन विधी तज्ञ श्री प्रमोद ढोकले यांनी केले. ते ‘१५ जून‘ या ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक (फेस्कॉम) मुंबई ; प्रादेशिक विभागाने हा कार्यक्रम मुंबईतील डिलायल रोड येथील श्रमिक ज्येष्ठ नागरिक संघात आयोजित केला होता.

जेष्ठांचा मानसिक, शारिरीक, आर्थिक तसेच लैंगिक छळ याबद्दल समाजात चर्चा होत नाही. तसेच असे अत्याचार, त्यांची माहिती द‌डपली जाते. कारण समाज वस्तुस्थिती ऐकायला तयार नसतो.
फसवणूक, पिळवणूक होते म्हणून पोलीसात तक्रार करावयाची म्हटले तर, “हा घरचा मामला आहे” असे म्हणून याकडे पोलीस दुर्लक्ष करतात. पण सन 2007 चा हा कायदा काय सांगतो याची आठवण करून देताना, एक ना अनेक ज्येष्ठांची होणारी छळवणूक या विषयावर त्यांनी सोदाहरण सविस्तर माहिती दिली. आपल्या ‘प्रॉपर्टी मधील हिस्सा / वाद कसा मिटवावा किंवा ज्येष्ठाच्या इच्छेप्रमाणे दानपत्र, इच्छापत्र कायदेशीर कसे करावे यावर मार्गदर्शन करून त्यांनी सर्व जेष्ठ नागरिक संघटनानी जेष्ठांच्या कायदयाचा अभ्यास करुन त्याची अधिकाधिक जनजागृती केल्यास जेष्ठांचा छळ कमी होण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर त्यांनी जेष्ठ नागरिकांच्या शंकांचे समाधानही केले.

यावेळी बोलताना ना. म. जोशी मार्गचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री अरविंद चंदनशिवे पोलीस दल ज्येष्ठांच्या मदती साठी तत्पर असल्याची ग्वाही दिली.

प्रारंभी मुंबई विभाग अध्यक्ष श्री.सुरेश पोटे यांनी स्वागत करून ज्येष्ठ नागरिक छळ कायद्याची जनजागृती होणे कसे गरजेचे आहे हे सांगितले.

सचिव मुकुंद फडतरे यांनी प्रास्ताविक करून सूत्र संचलनही केले. कार्यकारिणी सदस्य श्री दिलीप गाडेकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास फेस्कॉमचे पदाधिकारी, ज्येष्ठ स्त्री पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन

    प्रत्येक जेष्ठ व्यक्तीनी आपले कायदे माहीत करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीतजास्त व्यक्तीन पर्यंत पोहोचून त्यांना माहिती करून देणं गरजेचं आहे. कारण त्यांना कुठेही पोहोचणे शक्य होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version