Home बातम्या सानपाडा : ज्येष्ठ नागरिक संघात योगदिन साजरा

सानपाडा : ज्येष्ठ नागरिक संघात योगदिन साजरा

1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला १७५ देशांनी पाठिंबा दिला. त्यामुळे गेल्या अकरा वर्षांपासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार सतत उपक्रमशील असलेल्या नवी मुंबईतील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघात मोठ्या आनंदी वातावरणात योगदिन साजरा करण्यात आला.

भारतीय प्राचीन संस्कृतीत योग, योगासने आणि योगसाधना यांना विशेष महत्त्व आहे. शरीर आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजेच योग. योगामुळे आपले आरोग्य चांगले राहते. त्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग करावेत, असे आवाहान सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार तथा योगशिक्षक विष्णुदास मुखेकर यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी, बळवंत पाटील, योग शिक्षक मारुती पाटील, सीमा बोराडे यांनी योग विद्येवर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके देखील सादर केली. त्यांच्यासमवेत योग वर्गातील महिला व पुरुषांनीही योगासनाची प्रात्यक्षिके केली.

यावेळी योग शिक्षकांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी केले. तर आभार शरद पाटील यांनी मानले.

कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव ज्येष्ठ नागरिक, हास्य योग क्लब सदस्य, गार्डन परिवार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. छान ,एकदम झकास वृत्तांकन केले आहे. सर्व लोक त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर केले आहेत .धन्यवाद आपला योग दिन सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण केलेलं आहे .धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version