‘ज्येष्ठोत्सव’ या सनवल्ड, पुणे संस्थेतर्फे २० ते २२ सप्टेंबर दरम्यान पुण्याई सभागृह, कोथरूड येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकूण १५ संघांनी एकांकिका सादर केल्या. त्यात शब्दरंग कला साहित्य कट्टा, या निगडी प्राधिकरण या संस्थेने सादर केलेली “ब्लॅकमेल” ही एकांकिका प्रथम क्रमांकाची ठरली.
श्री सदानंद इनामदार लिखीत आणि श्री अशोक अडावदकर यांनी दिग्दर्शित केलेली अतिशय उत्कंठा वर्धक आणि रहस्यमय असलेल्या या एकांकिकेत सर्वश्री सुभाष भंडारे, चंद्रशेखर जोशी, सतीश सगदेव, शरद यनुवार, सौ पल्लवी कोंडेकर आणि सौ ज्योती कानेटकर या कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या.
या एकांकिकेला श्री मुकुंद जोशी आणि संपदा दिवाकर यांनी पार्श्वसंगीत दिले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे गेली १३ वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच हा करंडक आला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या यशाबद्दल प्राधिकरण मधील नागरिकांनी सर्वांचे अभिनंदन केले.
— लेखन : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800