Sunday, July 13, 2025
Homeपर्यटनटूर अमेरिका : 2

टूर अमेरिका : 2

या बेटावर चहुबाजूंनी लोक येत राहिले. बोटीने येथे यायचे. येथे इमिग्रेशन ऑफिस होते. तेथून ते राजधानीत जात. तेथील इमिग्रेशन ऑफिसचे आता म्युझियम केले आहे. तेथे अमेरिकेचा ध्वज डौलाने फडकत असतो. ध्वज 13 पट्टे व 27 चांदण्यांचा आहे. त्यांतील लाल पट्टे शौर्य, पांढरे पट्टे सचोटी, नि॓ळे पट्टे सुबत्ता दर्शवितात. तर 27 चांदण्या या 27 राज्यांच्या आहेत.

त्या भव्य दिव्य पुतळ्याकडे बघत बघत बोटीने परत न्यूयाॅर्क या राजधानीत परतलो. आणि चायना टाऊन, वाॅल स्ट्रीट पाहात पाहात म्हणजे बसमधूनच पाहात होतो. चायना टाऊन म्हणजे चायनीज् वस्ती व चीनी दुकाने. तर वाॅल स्ट्रीट शेअर मार्केटची गजबज. पाहता पाहता TwinTower शी येऊन धडकलो. पूर्वीच्या 108 मजल्यांची मिजास आतां संपलेल्या अवस्थेत. आतां Ground Zero ! येथे नवीन टाॅवरची बांधणी सुरू आहे. ‘World Trade Memorial Center’. तेथे जवळच एक पार्क होता. त्या पार्कमध्ये एका तलावात एक छान शिल्प उभे होते.

जगात 28 एकर जमिनीत 19 बिल्डींग अवघ्या तीन वर्षात बांधणा-या रायफल याच्या नांवे रायफल राॅक फेचर हे कमर्शिअल सेंटर तिथे उभे आहे. श्रीमंतांची वस्ती !

तिथेच एका ठिकाणी सर्व देशांच्या ध्वजांचं सम्मेलन भरले आहे. न्यूजर्सीहून रेल्वेने येणारे अनेक प्रवासी Twin Tower च्या बाजूनेच ये-जा करीत होते.

इथून आम्ही Empire State Building कडे मोर्चा वळवला. त्याच्या 86 व्या मजल्यावरून मॅनहटनची sky line पाहण्यात एक वेगळीच मजा होती. एवढ्या उंचीवरून सुध्दां आपण फार उंचावर आहोत असे वाटत नव्हते. कारण आजूबाजूच्या बिल्डींगसुध्दां तेवढ्याच उंचीवर होत्या. एका बाजूला नदीचे पात्र तर दुसरीकडे रस्ते आणि इमारतींचे जाळे ! इथेच UN headquarter observetary आहे. गच्चीमध्ये दुर्बिणी लावलेल्या आहेत. त्यातून दूरवरचे पाहण्यात लहान मुलाची उत्सुकता प्रत्येकात दिसून येत होती.

येथून बाहेर पडलो आणि गाठले Time Square. तिथली लगबग, घाई मला मुंबईची आठवण करून देत होती. पण फिरायला आलेले आमच्यासारखे लोक मात्र आरामात इकडे तिकडे बघत लाईटिंग,advertiseचे वेगळेवेगळे forms, लोकांचे मनोरंजन करणारे जोकर यांच्यात गुंग होते. आजूबाजूला नजर जाईल तेथे अफ्रोअमेरिकनांचा जथा दिसत होता. त्यांचे ते अर्धनग्न काळे रुप पाहून उबग आला. ही ब्रह्मदेवाचीच निर्मिती कां ? असा प्रश्र्न त्यांच्या रुपाकडे पाहून मनात उमटत होता. पुराणकाळातले दानव असेच असतील कां ? असा प्रश्र्न मनाला विचारावासा वाटत होता. अर्थात आम्ही कांही स्वरुपसुंदर नव्हतो आणि कोणावरही कसलीही टीका करण्याचा अधिकारही आम्हांला नव्हता. पण मनात आले एवढे मात्र खरे ! देवा मला क्षमा कर.
क्रमशः

स्वाती दामले

— लेखन : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments