माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणजेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त अजेय संस्था आयोजित ठाणे येथील “वाचनमाया” ह्या कार्यक्रमात ‘वाचन कलेचे मानकरी’ ह्या विषयावर प्रेक्षकांशी डॉ. क्षितिज कुलकर्णी यांनी नुकताच संवाद साधला.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजनाने केली गेली. अजेय संस्थेचे अध्यक्ष गौरव संभूस यांनी वाचनमाया कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली.
वाचनकलेचे मानकरी ह्या सत्रात डॉ. क्षितिज कुलकर्णी यांनी आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून आजच्या काळातील अस्वस्थ लिखाण करणाऱ्या लेखकांपर्यंत सर्व मानकऱ्यांना मानवंदना देत, ” वाचकाने स्वतःच्या वाचनाला कोणत्याही साहित्यप्रकाराच्या कक्षेत न बांधून ठेवता सर्व प्रकारचे अस्वस्थ करणारे वाचन करायला हवे.” असे नमूद केले.
त्यानंतर ‘पुस्तकांशी संवाद’ या सत्रा मध्ये अवधूत यरगोळे यांच्या रूपात प्रकट झालेल्या पुस्तकाची मुलाखत ऋषिकेश ताम्हनकर यांनी घेतली.
वाचक विशेष संवाद मैफिल ह्या सत्रात आपल्या आवडत्या पुस्तकाविषयी बोलण्यासाठी श्री.रामदास खरे,
डॉ. स्मिता दातार, किरण बोरकर, रवींद्र शेणोलीकर, डॉ.अंजुषा पाटील, साधना पाटील, मुग्धा फाटक, पूर्वा कसालकर हे वाचक उपस्थित होते. अस्मिता चौधरी यांनी त्यांना बोलते केले. कातळ, सदाफुली, एक होता कार्व्हर, अरिंदम,फक्त तिच्यासाठी, दा विंची कोड, लमाण, प्रवास जगण्याचा, अश्या विविध पुस्तकांची, त्यांच्या लेखकांची, कार्याची ओळख ह्या परिसंवादातून केली गेली.
कार्यक्रमाचे निवेदन हेमांगी कुलकर्णी आणि विदुला खेडकर यांनी केले.
अजेय संस्थेची लवकरच येणारी चित्रकलाकृती “भयकथा” याची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमासाठी श्री शैलेश साळवी, मायबोली संस्थेच्या स्वाती चव्हाण, छाया धोपेश्वरकर, अशोक धोपेश्वरकर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात अजेय संस्थेचे भावमुद्रा संशोधन केंद्रासाठी चे अर्थपूर्ण वाक्यानी सजलेले बुकमार्क्स ठेवण्यात आले होते.
पुस्तकांचे फुलपाखरू असलेले बॅनर कम सेल्फी पॉईंट अश्या वेगळ्या आणि आकर्षक कल्पना मांडल्या होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रथम वाचक गुरु असलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान अजेय संस्थेने केला.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमांची सांगता झाली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
स्तुत्य असा कार्यक्रम झाला. डॅा. क्षितीज कुलकर्णी व टीम मधील अवधूत येरगोळे, गौरव संभूस व कार्तिक हजारे झकास
कामे करत असतात.शिक्षकांचा सन्मान हेदेखील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कार्यक्रमाची माहिती सुरेखरित्या मांडली आहे.