Home बातम्या डिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता

डिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता

1

आजच्या जगात, डिजिटल संसाधने, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा अनियंत्रित वापर, चुकीची माहिती व अयोग्य कंन्टेंट इत्यादींमुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होतात. यामुळे इंटरनेटचे व्यसन, वाईट प्रभाव, साइबर क्राइम, ऑनलाइन स्कॅम, फ़िशिंग ईत्यादींना विद्यार्थी बळी पडण्याचा धोका वाढतो.

या बरोबरच त्यांचा अभ्यास, डिजिटल सुरक्षितता, मानसिक आरोग्य, वागणूक, इतरांबद्दलचा दृष्टिकोन, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन यांच्यावर सुद्धा दुष्परिणाम होतो.

यावर उपाय म्हणून लहान वयात व शालेय स्तरापासून विद्यार्थ्याना माध्यम साक्षरता व डिजिटल सेफ़्टी चे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ज्याद्वारे त्यांना सर्व प्रकारच्या मीडिया, इंटरनेट आणि इतर डिजिटल तंत्रज्ञान जबाबदारीने आणि सकारात्मक पद्धतीने वापरण्यासाठीच्या ज्ञान, क्षमता आणि कौशल्य प्राप्त होतील. ते एक प्रभावी डिजिटल सिटिझन बनण्यासाठी मदत होईल.

या सर्व बाबी विचारात घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या मोठीजुई येथील प्राथमिक शाळेत व्यक्तित्व लर्निग लॅब्स च्या वतीने पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना नुकतेच डिजिटल सेफ़्टी व माध्यम साक्षरता प्रशिक्षण देण्यात आले.

व्यक्तित्व लर्निग लॅबचे निखिल लता, गजानन सर व मयुरा सावी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक संजय होळकर यांनी प्रास्ताविक केले. तर, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री दर्शन पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाला मोठीजुई च्या सरपंच अश्विनीताई भोईर, ग्रामपंचायत सदस्या माधुरी भोईर, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा तृप्तीताई बंडा,
सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

विठ्ठल ममताबादे.

– लेखन : विठ्ठल ममताबादे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. सोशल मिडीया आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे.त्यांच्या अनिर्बंध वापराचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. मात्र ते आज अनिवार्य आहे.अशा परिस्थितीत डिजिटल माध्यमांची ओळख करून देऊन त्याच्याविषयी सुरक्षा बाळगण्याचे सकारात्मक प्रशिक्षण एका शाळेत दिले गेले हा उपक्रम निस्चितच अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version