आज-काल लहान मुलांना दवाखान्यात नेण्याआधी ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागते, त्यामुळे आपल्या वेळेनुसार मुलांना ट्रीटमेंट मिळत नाही. अव्हेलेबल असेल तोच स्लॉट घ्यावा लागतो. कधीकधी खूप अर्जंट डॉक्टर मिळत नाहीत. त्यामुळे मुलांना ताप असताना टेन्शन येते. डॉक्टर लगेच हवेत, असे वाटते.
माझा मुलगा असेच एकदा आजारी असताना कुणी अर्जंट डॉक्टर मिळत नव्हते. अंगात ताप होता. ॲप डाऊनलोड करून मी दुसरीकडे अपॉईंनटमेंट मिळवली. पण डॉक्टर आले नव्हते. ताप वाढत चालला होता. मी काळजीने कुठे लगेच डॉक्टर मिळतील अशी चौकशी केल्यानंतर मला जॅक अँड जिल हॉस्पिटल बद्दल मैत्रिणीकडून समजले जे सानपाड्यामध्ये आहे.
डॉ. प्रेम पहुजा हे लगेच हॉस्पिटल मध्ये येऊन मुलांना चेक करून ट्रीटमेंट देतात. आम्ही तेव्हा त्याला डॉक्टर कडे नेले व वेळेवर उपचार मिळाले. जे पालक एकटे आहेत, जॉब करणारे आहेत, त्यांच्यासाठी डॉक्टर स्वतःचा टाईम ऍडजेस्ट करतात, असे हे एकमेव ठिकाण होते जिथे जास्त वेळ न थांबता नंबर यायचा. मुलांचे हाल होत नव्हते. डॉक्टर म्हणजे देवाचं दुसर रुप जे आम्हाला सरांच्या रूपात भेटलेले.
माझे सासरे, माननीय जगन्नाथ आबासाहेब जगताप, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष यांचे आणि डॉक्टरांचे, मैत्रीचे संबंध जुळल्याने ते आमचे फॅमिली डॉक्टर झाले आणि चोवीस तासांमध्ये कोणत्याही वेळी आपल्या मुलांना डॉक्टर अव्हेलेबल होऊ शकतात याचा आम्हाला खूप आनंद झाला.
मुलांचे लसीकरण आणि लहान-लहान प्रॉब्लेम डॉक्टर सोडवत होते. इतरही प्रत्येक मुलाची स्वतः येऊन तपासणी करून, ते लगेच ट्रीटमेंट चालू करत होते मिलेनियम टॉवर सोसायटी मधील माझ्या खूप मैत्रिणी त्यांच्याकडे जात.
तारीख ६/३/२०२१ माझ्या मुलाला त्याची काकी, श्रुतिका डॉक्टरांकडे घेऊन गेली होती, तेव्हा परत आले की त्यांच्या आईला घेऊन रूटीन चेकअप ला या असा निरोप डॉक्टरांनी दिला ..
ते जवळच आहेत कायम भेटतात या विश्वासावर पूर्ण ६ महिन्यानंतर ……
मी आता गणपतीला आले तेव्हा, दि. १८/९/२०२१ ला मुलाला घेऊन त्याच्याकडे गेले त्यांनी खूप पटकन त्याचा छोटासा त्रास काही मिनिटात solve केला,
काही औषधे लिहून दिली जी आजही मी त्याला देत आहे. परत आले की त्यांना नक्कीच भेटू या 100% विश्वासात आम्ही दोघी मुलासहित परत आलो.
आणि आज….
आज अचानक मला message मध्ये फोटो येतो, जो डॉक्टरांचा असून त्या खाली भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहिलेले वाचले आणि….काळजात चर्र झालं😢
2 दिवसांपूर्वी भेटलेले डॉक्टर, ज्यांना आपण पुन्हा येऊ असे सांगून येतो ते आता परत भेटणारच नाहीत ? ते या जगातच नाहीत ..?
किती अनिश्चित, अनपेक्षित आयुष्य आहे माणसाचे !
मला परवा भेटणारा माणूस परत कधी दिसू शकणार नाही..किती भयाण सत्य आहे हे जीवनाचे !
एरवी खूप बातम्या येतात. कोरोना, दंगे, हल्ले, रोग याने जाणारे लोक, पण आपल्या जवळचा माणूस दगावला की मृत्युच्या निशब्द पावलांची त्याच्या दगलबाज हल्याची जाणीव होते …
५ वर्षापासून मी त्यांना ओळखत होती. त्यांची तब्बेत तशी खालावली होती. पण तुम्ही बरे आहात का ? असे साधं १ वाक्य देखील मी त्यांना विचारलं नाही ! जे बऱ्याच वेळा आपण गडबडीत विसरतो किंवा माणूस असताना ते तितकं गरजेचं वाटतं नाही आपल्याला.
पण आज कितीही शब्द लिहिले तरी ते त्यांच्यापर्यंत पोचणार नाहीत. त्यापेक्षा ते विचारपूस करणारे, ते एक वाक्य मी बोलायला हवं होते ही खंत आज झोप येऊ देत नाही.
आपण खूप सहज, सत्य न समजता जगतो. कालपर्यंत ते माझ्या काही पोस्ट वाचून मला प्रतिसाद देत आणि आज त्यांच्यावर लिहित आहे पण ते त्यांना कधीच माहितीही होणार नाही. त्यामुळे आज विनंती आहे माझी या निमित्ताने सगळ्यांनाच विचारपूस करत चला. खूप ठाम असतो आपण आयुष्यावर पण ते क्षणभंगुर आहे.
त्यांचं असं जाणे त्यांच्या घरच्या सोबतच त्यांच्या पेशंटच्या मुलांना पण खूप पोरके करणारे आहे.
डॉक्टर कायम शांतपणे मार्गदर्शन करायचे. कॉल, मेसेज रिप्लाय देऊन नेहमीच मुलाच्या तब्येतीची कशी काळजी घ्यायची ते सांगत. त्यांना आम्हा सगळया मिलेनियम सोसायटीच्या परिवाराकडून डॉक्टरांना भावपूर्ण श्रदांजली 🙏

– लेखन : वर्षा खेसे-जगताप
– संपादन : अलका भुजबळ, 9869484800
वास्तवातील कटू सत्य सांगणारा लेख,त्याचबरोबर दिलेला सल्ला -खूप मोलाचा,खरच आयुष्य क्षणभंगुर आहे ,
तूमच्यापासूनच सुरवात करते ,कश्या आहात ?!😀😊,मस्त रहा ,मजेत रहा नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
फार सुंदर लेख.मनाला भिडणारा. काही कारणांनी भेटणारी माणसं कधी मनात घर करून बसतात कळत नाही..
जीवन वस्तू स्थिती….उत्तम लेखन.एक उत्तम व्यक्तिमत्व डॉ…… अप्रतिम लेख.अचूक जीवनाचा वेध…….