Friday, December 26, 2025
Homeसेवाडॉक्टर व्हायचंय ? ( १ )

डॉक्टर व्हायचंय ? ( १ )

डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या बऱ्याच मुलामुलींच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील एमबीबीएसचे स्वप्न बघणा-या विद्यार्थ्यांना माफक खर्चात डॉक्टर होण्याची अमूल्य संधी आहे.
त्या विषयी विस्ताराने जाणून घेऊया !

विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणे हल्ली सहज शक्य झाले असून, अनेक भारतीय विद्यार्थी या संधीचा लाभ घेत आहेत. जगातील अनेक ख्यातनाम देशात भारतीय विद्यार्थी एमबीबीएसची पदवी घेऊन मायदेशी परतले आहेत. तेथे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी जीवघेण्या स्पर्धा नसून, आर्थिक बाबदेखील सर्वसामान्य पालकांच्या खिशाला परवडणारी आहे.

वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. परंतु, भारतात एमबीबीएसच्या जागा अल्प आहेत. देशात एमबीबीएसच्या एकुण जवळपास ९० हजार जागा असून, यासाठी दरवर्षी सरासरी १७ ते १८ लाखांवर विद्यार्थी तयारी करतात. यामध्ये महागड्या शिकवणीपासून तर पूर्व परीक्षेपर्यंतच्या तयारीचा समावेश आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मोठी रक्कम खर्च करावी लागते. परीक्षा पास होऊनही जागेच्या कमतरतेमुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर तर होतोच; पण कधी कधी नैराश्यही वाट्याला येते. आणि पालकही आर्थिकदृष्टया डबघाईस येतात. पुढच्या वर्षासाठी तयारी करायची तर पुन्हा एबीसीडीपासून सुरूवात करावी लागते. ही तयारी अनेक पालकांना परवडणारी नसल्याने विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचा नाद सोडून अन्य पदवीच्या मागे लागतात. ज्यांना मेरीटनुसार एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला नाही त्यांना डोनेशनची तयारी करावी लागते. डोनेशनदेखील सर्वसामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर असते. शिवाय शिकवणीचा तसेच परीक्षेच्या तयारीसाठी वेगळा खर्च, अशी देशातील वैद्यकीय शिक्षणाची स्थिती आहे.

दरम्यान, जगातील रशिया, चीन, जॉर्जिया, कझाकीस्तान आणि ईतरही अनेक देशांनी गुणांची स्पर्धा न ठेवता प्रवेश प्रक्रिया सुलभ केली आहे. डोनेशन सारख्या खर्चालाही बगल देत सर्वांनाच वैद्यकीय शिक्षणाचे दरवाजे खुले केले आहेत. या देशातील वैद्यकीय महाविद्यालये जागतिक क्रमवारी आणि गुणवत्तेत अव्वल आहेत. या देशात वैद्यकीय शिक्षण इंग्रजी भाषेतूनच दिले जात असल्याने भाषेची मुळीच अडचण नाही. भारतातील व तेथील कोर्स सारखा असुन आपल्या देशातही त्याला मान्यता आहे. त्यामुळे आता जगभरात कोठेही वैद्यकीय शिक्षण अर्थात एमबीबीएस होता येऊ शकते. भारत आणि या देशातील वैद्यकीय शिक्षण समान असल्याने त्याला जगभरात मान्यता आहे.

सर्व सुविधा उपलब्ध
परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाकरिता सर्वसुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्र्थ्याची सुरक्षा, अत्याधुनिक वसतिगृह, आरोग्य सुविधा महाविद्यालय परिसरात ऊपलब्ध आहेत. भारतीय पध्दतीचे भोजनालय तसेच स्वत: स्वयंपाक करण्यासाठी स्वतंत्र किचनची व्यवस्था, बॅंक, एटीएम सारख्या व्यवस्था असल्याने पालकांना मुलांच्या खात्यात थेट रक्कम पाठवणे सोपे झाले आहे. काही महाविद्यालयांमध्ये जीम, ब्युटीपार्लर, डिपार्टमेंटल स्टोअर्स तसेच विविध खेळांची क्रीडांगणे आहेत. अभ्यासासाठी स्टडीरूम, लायब्ररी असून, महाविद्यालयाव्दारे शिक्षणातून तयारी करून घेतली जाते. पाल्यांशी संपर्कासाठी मोबाईल, वॉटसअप, व्टिटर व व्हीडीओ कॉलची सुविधा हल्ली इंटरनेटवर उपलब्ध आहे.

दोन्हीकडे अर्ज करू शकता
बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्कस् असतात. त्यांना भारतातील कॅालेजमध्ये प्रवेश मिळेल अशी आशा असते. पण दुर्दैवाने प्रवेश मिळाला नाही तर पुढे काय ? असा प्रश्न त्यांना पडतो. अशा परिस्थतीत
भारतामध्ये तसेच परदेशात एकाचवेळी अर्ज करता येतो. त्यामुळे भारतात प्रवेश निश्चित झाला नाही तर परदेशाचा पर्याय शिल्लक राहतो. तथापि, परदेशात प्रवेश निश्चित करण्यासाठी लवकरात लवकर अर्ज प्रक्रीया करणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला तुमची परदेशातील सीट रिझर्व करून ठेवता येते.
परदेशात वैद्यकीय शिक्षणाबाबत माहिती देण्याकरिता अनेक संस्था कार्यरत आहेत.

प्रवेशासाठी पात्रता
या देशात एमबीबीएसला प्रवेश घेण्याकरिता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला सरासरी १२ वी मध्ये ५० टक्यांच्यावर आणि नीट परीक्षेत १३७ चे आसपास मार्क असणे आवश्यक आहे तर, एससी, एसटी, ओबीसीसाठी १०८ च्या आसपास मार्क असणे ह्या परिक्षेत आवश्यक आहेत. बारावीच्या परिक्षेत एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक आहेत. (2019 नुसार)

डोनेशन नाही
परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता कोणत्याच प्रकारचे डोनेशन द्यावे लागत नाही. वार्षिक शैक्षणिक शुल्क साधारण: दोन लाख रूपयांपासून तर तीन ते साडेतीन लाखाच्या पुढे आहे. ते आपण कोणते विद्यापीठ निवडतां ह्यावर अवलंबून आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये वसतिगृहाची व्यवस्था आहे. तसेच परदेशातील काही विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षणात चांगले गुण मिळवल्यास शिष्यवृत्तीची सुविधा देखील उपलब्ध आहे.

विषयातील प्राविण्य हे शिष्यवृत्तीचे निकष आहेत. यामध्ये अनेक विषयात प्राविण्य असेल तर त्यानुसार शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामुळे शिक्षण शुल्कातही दिलासा मिळतो.

एमसीआयची संधी
परदेशातून एमबीबीएसची पदवी घेऊन परतल्यानंतर विद्यार्थाला मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) ची FMGE (Foreign Medical Exam) परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत ३०० पैकी १५० गुण असले तरी उत्तीर्ण समजण्यात येते. ही परीक्षा एमबीबीएसच्या अभ्यासक्रमावरच आधारीत आहे. ही परीक्षा पास होईपर्यंत विद्यार्थांना अनेक संधी देण्यात येतात. त्यामुळे या परीक्षेबाबत विविध उलटसुलट गोष्टी पसरवल्या जाऊन मनात असलेली भिती निरर्थक आहे.

गुगलवर माहिती
जगातील वर्ल्ड रॅकींगच्या मेडिकल कॉलेजची माहिती गुगलवर उपलब्ध आहे. सर्च करा आणि देश व मेडिकल कॉलेज निवडा. ज्या संस्थेमार्फत प्रवेश घ्यायचा त्यांच्याकडे कागदपत्रांची पुर्तता करा. परदेशात जाण्याकरिता लागणारे पासपोर्ट, व्हिसा, आदी प्रक्रीया संस्था उपलब्ध करुन देते. त्यामुळे विदेशात शिक्षण घेणे अगदी सहज व सोपे झाले आहे.

माझ्या दोन्हीही मुलींनी परदेशातुनच एमबीबीएस चे शिक्षण घेतले आहे.
ही माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी ह्या ऊद्देशाने कोणतेही शुल्क न आकारतां, गेल्या काही वर्षापासुन मी हा सेवाभावी उपक्रम राबवत आहे

आपणालाही काही माहिती हवी असल्यास विनामुल्य सेवा प्रदान करण्यात येईल.
आपणही ह्या संधीचा लाभ घ्या.
क्रमशः

ॲड अनंत खेळकर

– लेखन : ॲड्.अनंत खेळकर. अकोला
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”